मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, एकूण ₹61,500 प्रति महिना !! अर्जाची लिंक सुरु! | Mahades Fellowship Application Form 2025
Mahades Fellowship Registration Form 2025 - mahades.maharashtra.gov.in
Mahades Fellowship Application Form 2025
Mahades Fellowship Application Form 2025 – The “Chief Minister’s Fellowship Program” 2025-26, conceived by Chief Minister Devendra Fadnavis, has been announced to provide experience in administrative work to the youth of the state, to utilize the creativity and ability to present different ideas, enthusiasm, and interest in technology among the youth in the administration, and to bring dynamism to administrative processes through this. Accordingly, 60 fellows will be selected in this program. The criteria for the selection of fellows, the terms and conditions for appointment, as well as the government decision regarding the outline and implementation of the educational program implemented through educational institutions have been made available on the website of the Government of Maharashtra. This program will be implemented through the Directorate of Finance and Statistics of the Planning Department
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम’ पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील 60 तरुणांची निवड करण्यात येणार असून, त्यांना एक वर्षासाठी जिल्हाधिकारी वा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधीन महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत थेट काम करण्याचा अनुभव मिळावा, त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा विस्ताराव्यात आणि त्यांच्या कल्पकतेचा, ताज्या दृष्टिकोनाचा व तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाचा उपयोग प्रशासनाला व्हावा, यासाठी या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत होणार आहे. फेलोशिपचा कालावधी 12 महिने असून आणि वयोमर्यादा 21 ते 26 वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून लवकरच सुरू होईल. अर्ज शुल्क ₹500 असेल. पात्रता म्हणून कोणत्याही शाखेतील किमान 60% गुणांसह पदवी, 1 वर्षाचा अनुभव, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान, आणि संगणक हाताळणीचे कौशल्य आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी, निबंध लेखन आणि मुलाखत हे तीन टप्पे असतील. या योजने मध्ये अर्ज करणाऱ्या फेलोंना एकूण ₹61,500 प्रति महिना देण्यात येतील. महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी एक महत्त्वाकांक्षी आणि आकर्षक संधी उपलब्ध झाली आहे. ही संधी म्हणजे महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025. या कार्यक्रमाअंतर्गत, तरुण प्रतिभावंतांना राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची अमूल्य संधी मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला ६१,५०० रुपयांचे विद्यावेतन मिळवत स्वतःच्या कौशल्याचा विकास करण्याची ही एक अद्वितीय संधी आहे. चला तर या बद्दल पूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया.
Chief Minister Fellowship, 2025 Application Process has been started today. Chief Minister Fellowship Program is an important initiative of the Government of Maharashtra. The Chief Minister Fellowship Program offers the youth an opportunity to be a part of the government. The innovative ideas of the fellows help the administration. The enthusiasm and tech savviness of fellows gives momentum to the administrative processes. The program helps the young fellows in broadening their vision through knowledge and experiences. The last date for CMF Registration 2025 is yet to announced. After that, NO CMF Application Form will be accepted. So students must apply for Mahades Fellowship Application Form 2025 @mahades.maharashtra.gov.in
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत केली जाईल.
Maha CM Fellowship Selection Criteria 2025
फेलोंच्या निवडीचे निकष :-अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. (किमान ६०% गुण आवश्यक)
Maharashtra CM Fellowship Experience Required
अनुभव : किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
भाषा व संगणक ज्ञान : मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.
Mukhyamantri Fellowship Age Limit
वयोमर्यादा :– उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
Mukhyamantri Fellowship Application 2025 Fee
अर्जाकरिता शुल्कः- रुपये ५००/-. या कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.
निवड प्रक्रिया :- फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online (Objective Test) द्यावी लागेल.
ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.
वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे २१० उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहीत तारखेस विहीत वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.
निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक २० जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील.
फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.
CM Fellowship 2025 Stipend
या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६,१००/- व प्रवासखर्च रुपये ५,४००/- असे एकत्रित रुपये ६१,५००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.
शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यांनंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा, आयआयटी, मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरिक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.
सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.
शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
Table of Contents
Result Out