रुग्णवाहिका चालकांचे पगार अडकले, १५ हजार चालकांचे वर्षभरापासून हाल!
Mahaarogya Arogya Vibhag Recruitment 2025
NHM Maharashtra Bharti 2025
शहरी तसेच ग्रामीण भागातील गर्भवती रुग्णांना आरोग्य केंद्रातून घरी आणि घरातून आरोग्य केंद्रात ने आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या राज्यातील रुग्णावाहिकांच्या कंत्राटी चालकांची उपासमार सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून सरकारने पगारच दिला नसल्याने त्यांच्यासह कुटुंबीयांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुमारे १५ हजारांहून अधिक कंत्राटी रुग्णवाहिका चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार देण्यात येतात. त्या ठिकाणी येणारा रुग्ण गंभीर असल्यास त्याला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येतात. त्याशिवाय गर्भवतींनी सरकारी रुग्णालयात बाळंतपण करावे यासाठी तसेच माता मृत्यू, बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी १०२ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला. या टोल फ्री क्रमांकाद्वारे गर्भवतीच्या घरापर्यंत रुग्णवाहिका पोहोचते. घरातून गर्भवतीला आरोग्य केंद्रात उपचार तसेच तपासणीसाठी नेले जाते. तेथून पुन्हा घरी सोडण्यात येते. यासाठी त्या रुग्णवाहिकेला १०२ क्रमाकांची रुग्णवाहिका म्हणून ओळखले जाते.
आरोग्य विभागाच्यावतीने राज्यात ही मोफत रुग्णवाहिका अनेक वर्षांपासून राबविण्यात येते. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य केंद्रात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत (एनआरएचएम) कंत्राटी रुग्णवाहिका चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने आरोग्य विभागात सफाई कामगार तसेच वाहन चालकांची भरती बंद केली आहे. त्यामुळे कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात आजमितीला १८ हजार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून खासगी संस्थांमार्फत कंत्राटी चालक भरती करण्यात आली आहे. एनएचएम, एनआरएचएम अंतर्गत तसेच १०२ क्रमाकांच्या रुग्णवाहिकांवर राज्यात सुमारे १५ हजारांहून अधिक कंत्राटी चालक नियुक्त केले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून खासगी ठेकेदाराला कंत्राटी चालकांचा पगार दिला जातो. पुणे जिल्ह्यात सुमारे १० हजार ५०० रुपये पगार दिला जातो. मात्र, आरोग्य विभागाने ठेकेदारांना पैसेच दिले नसल्याने कंत्राटी चालकांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे गेल्या फेब्रुवारी, मार्च पासून त्यांची उपासमार सुरू आहे. कुटुंबीयांचे हाल होत आहेत. तसेच चालक कर्जबाजारी झाले आहेत, अशा तक्रारी पुढे आल्या आहेत. आता पगारच न मिळाल्याने चालकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निधीसाठी पुरवणी मागणी केली होती. मात्र, पुरवण्या मागण्या म य झाल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाकडे निधीच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे कंत्राटी चालकांना पगार देता आला नसल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आरोग्यमंत्र्यांच्या संस्थेचा ठेका ? प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या संस्थेकडून किंवा कंपनीकडून कंत्राटी चालक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पुरविण्यात येतात. योगायोगाने कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना कंत्राटी चालक पुरविण्याचा ठेका आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याच एका संस्थेमार्फत घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठेका चालक पुरविण्याचा ठेका चालवित आहेत, अशी माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली. आरोग्य विभागाकडे निधीच उपलब्ध नसल्याने या कंत्राटी चालकांना पगार मिळत नाहीत. मात्र, आबिटकर हे स्वतः आरोग्य मंत्री झाल्याने आता हा प्रश्न सोडवतील का असा सवाल आरोग्य खात्यातून विचारला जात आहे.
Mahaarogya Arogya Vibhag Recruitment 2025
House and linen keeper
मधील प्रश्न न 77.भारत चीन युद्ध 1971 साली झाले
योग्य उत्तर आहे 1962
पुस्तके एकनाथ पाटील ठोकडा पण न 84 वर
तसेच फौजदार यशोमार्ग प्रकाश गायकवाड
पण न 250 योग्य उत्तरं दिले आहे 1962
फेब्रुवारी 2019 मध्ये फॉर्म भरलेला आहे. हॉल तिकीट कसे मिळेल?
नमस्कार सर मागील 2019 च्या डीएचएस परीक्षेचे काय अपडेट आहे
List lagli kay