महत्वाचे- TET परीक्षा वेळापत्रक जुलैअखेर जाहीर होणार,ऑनलाईन कि ऑफलाईन?! – Maha TET Exam online Now

Maha TET Exam online Now – The leak of the Teacher Eligibility Test (TET Maha TET Exam online Now) 2026 paper, conducted by the Maharashtra State Council of Examination (MSCE), triggered massive uproar in both the Legislative Assembly and Legislative Council on Monday. Opposition and ruling party members united in cornering the government, demanding stringent action against those responsible for compromising the future of thousands of aspirants. In a bid to offer immediate relief to affected aspirants, the Education Minister announced that the TET 2026 re-examination will be conducted in a completely transparent, disciplined, and secure environment.

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पेपरफुटी प्रकरणानंतर आता पुन्हा परीक्षा घेताना ती ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून चाचपणी केली जात आहे. ही परीक्षा ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचा निर्णय अंतिम झाल्यानंतर नव्याने परीक्षेचे वेळापत्रक जुलैअखेरपर्यंत जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांना टीईटी पात्र होणे बंधनकारक असल्याचा निर्णय सप्टेंबर २०२५मध्ये दिला. तसेच टीईटी पात्र होण्यासाठी २०२८ पर्यंतची मुदत दिली आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेतली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर टीईटी परीक्षेची नोंदणी वाढत असल्याचे दिसते. परीक्षा परिषदेने २८ जूनला राज्यात टीईटी परीक्षा ठेवली होती. या परीक्षेसाठी एकूण सहा लाख १२५ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी नोंदणी केलेल्या चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींमध्ये दोन लाख २६ हजार २६३ कार्यरत शिक्षकांचा समावेश होता. परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत, या दृष्टीने काटेकोर उपाययोजना केल्या होत्या. मात्र, परीक्षेपूर्वी आदल्या दिवशी भिवंडीत पेपर फुटला. या पार्श्वभूमीवर टीईटी ऑनलाइन घेण्याच्या दृष्टीने विचार होत असून, त्या दृष्टीने तपासणी केली जात आहे. सर्वांत आधी परीक्षा ऑनलाइन घ्यायची, की प्रत्यक्ष पद्धतीने घ्यायची हे निश्चित करण्यात येईल.

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संगणक आधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याच्या दिशेने शासनाने पाऊल टाकल्याचे दिसते आहे. ही परीक्षा कशी होणार, कोण घेणार, किती वेळा घेणार, याचा तपशील गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आणि अत्यंत पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी ‘आयबीपीएस’ या नामांकित संस्थेला अधिकृत पत्र पाठवले आहे. परिषदेचे आयुक्त महेश चोधे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले असून, यात परीक्षेच्या सुरक्षित आणि जलद नियोजनाची विनंती करण्यात आली आहे. यापूर्वी महाटीईटी परीक्षा २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव परीक्षा परिषदेने जाहीर प्रकटनाद्वारे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता यापुढील सर्व परीक्षा ऑनलाइन कार्यपद्धतीचा अवलंब करूनच घेतल्या जाणार आहेत. शासन निर्देशानुसार, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबवण्याचा विचार आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Maha TET Letter For online Exam

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ चा पेपर फुटल्याच्या घटनेमुळे सोमवारी विधानसभा आणि विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला. विरोधकांसह सर्वपक्षीय सदस्यांनी सरकारला या प्रकरणावर धारेवर धरत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सविस्तर निवेदन करत महत्त्वपूर्ण घोषणा केली. टीईटी २०२६ ची फेरपरीक्षा पूर्णपणे पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात घेण्यात येईल. या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, पुढील वर्षापासून टीईटीसह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही शिक्षण मंत्र्यांनी केली. पेपरफुटीसारख्या कायमस्वरूपी आळा घालणे, घटनांना परीक्षेतील पारदर्शकता वाढविणे आणि उमेदवारांचा विश्वास पुनर्स्थापित करणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

TET Exam Update

Maha TET Exam online Now

दरम्यान, या घोषणेनंतर राज्यातील लाखो टीईटी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी काळात परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी सांगितले की, “पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारने टीईटी व इतर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, ऑनलाइन परीक्षा सुरू करण्यापूर्वी राज्यातील सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, अशा प्रकारे पुरेशी परीक्षा केंद्रे, सक्षम तांत्रिक सुविधा आणि मॉक टेस्टची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच, टीईटी २०२६ च्या फेरपरीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचा निर्णय हा उमेदवारांना मोठा दिलासा देणारा असून फेरपरीक्षा पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, अशी आमची अपेक्षा आहे.”

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड