SSC Board Certificates Update
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रिकांचे वाटप होणार आहे. ०१ मे रोजी दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. यंदा निकालाच्या २४ दिवसानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार असून अकरावी, पॉलिटेक्निक, आयटीआय प्रवेशाला गती मिळणार आहे.
राज्य मंडळाच्या वतीने दहावीची फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. परीक्षेचा ऑनलाइन निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. राज्यभरात १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून एक लाख ८४ हजार ९४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख ६३ हजार ५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल जाहीर होऊन वीस दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी झाल्याने छापील गुणपत्रिका कधी मिळणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते.
विभागीय मंडळांकडून १ जून रोजी सकाळी ११ वाजता माध्यमिक शाळांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. त्यानंतर संबंधित शाळांमध्ये दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक, प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. गुणपत्रिका मिळाल्यानंतर आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला गती येईल, असे शिक्षकांनी सांगितले.
HSC Board Certificates Update
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ मे रोजी गुणपत्रिकांचे वाटप होणार आहे. बारावीचा निकाल दोन मे रोजी ऑनलाइन जाहीर झाला होता. यंदा निकालाच्या २३ दिवसांनंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली हाती. त्याचा निकाल दोन मे रोजी ऑनलाइन जाहीर झाला होता. राज्यभरात १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून एक लाख ८२ हजार ६८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
त्यापैकी एक लाख ६२ हजार २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल जाहीर होऊन महिना होत आला. छापील गुणपत्रिका कधी मिळणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. अखेर मंडळाने २५ मे रोजी गुणपत्रिक तथा प्रमाणपत्राचे वितरण होईल, असे जाहीर केले. बारावी परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र व तपशिलवाद गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना २५ मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
HSC Board Certificates Update
राज्य मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सोमवारी (२५ मे) प्रदान करण्यात येणार आहे. राज्य मंडळाने याबाबत सर्व विभागीय मंडळे; तसेच ज्युनिअर कॉलेजांना सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दोन मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. यानंतर आता गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत करण्यात येणार आहे. सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना हे साहित्य २५ मे रोजी सकाळी ११ वाजता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. विभागीय मंडळांनी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित केले असून, प्राचार्य, विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.
Maha SSC, HSC Board Certificates Update
विद्यार्थ्यांना दहावी बारावीची प्रमाणपत्रे विविध कामांसाठी गरजेची असतात. परंतु, ती हरवली किंवा त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता वाटली तर विभागीय मंडळांमध्ये जाऊन हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित प्रक्रिया अत्यंत किचकट वाटत होती. परंतु त्यामध्ये बदल करण्यात आला असून संबंधित प्रमाणपत्रे आता ऑनलाइन देणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आधारकार्डवरील ओटीपीच्या मदतीने थेट घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यापूर्वी या प्रमाणपत्रांसाठी आकारले जाणारे विविध शुल्क रद्द करण्यात आले असून आता कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी प्रति प्रत ५०० रुपये एवढे एकच शुल्क आकारले जाईल. अर्जासाठी वेगळे शुल्क लागणार नाही.
ऑनलाइन अर्ज आल्यानंतर विभागीय मंडळांना संबंधित प्रक्रिया तीन दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक असेल. १९९० नंतरची सर्व गुणपत्रके ई-मार्कशीट प्रणालीमध्ये उपलब्ध असल्याने त्या कालावधीनंतरची प्रमाणपत्रे सॉफ्ट कॉपी स्वरूपात विभागीय मंडळ आणि अर्जदार दोघांनाही तत्काळ मिळणार आहेत. पोस्टाने मागणी केल्यास प्रमाणपत्रे स्पीड पोस्टने पाठवली जातील.
यापूर्वी प्रमाणपत्रांवर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा शिक्का व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी आवश्यक होती; मात्र नव्या प्रणालीत याची गरज राहणार नाही. सर्व प्रक्रिया मंडळाद्वारे ऑनलाइन पूर्ण केली जाईल.
ऑनलाइन भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना याबाबत योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. माळी यांनी केले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















