वैधमापनशास्त्र विभागात निरीक्षक पदांच्या भरतीस अंतिम रूप, राज्यभर ८१ उमेदवारांची नियुक्ती

Purvatha nirikshak bharti 2025

MahaFood Bharti 2025

राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या वैधमापनशास्त्र विभागात अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या निरीक्षक (गट-ब) पदांची भरती अखेर पार पडली आहे. एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या आधारे सरळसेवेच्या माध्यमातून एकूण ८१ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांना शासनाने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत.

या परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला असून, त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांना लवकरच त्यांच्या नेमून दिलेल्या कार्यस्थळी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महत्त्वाचे मुद्दे :

  • अनेक वर्षांनंतर निरीक्षक पदांची भरती

  • राज्यभरातून ८१ उमेदवारांची सरळसेवेने निवड

  • पुणे विभागात सर्वाधिक २३ उमेदवार रूजू

ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याने विभागातील कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

 


 

MahaFood Bharti New GR 2024

MahaFood Bharti 2024

दि.१८.४.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. तसेच वित्त विभागाच्या संदर्भ क्र.२ येथील शासन परिपत्रकान्वये सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पालघर कार्यालयातील आकृतीबंधाचा प्रस्ताव उपसचिव समिती व उच्चस्तरीय सचिव समितीसमोर वित्त विभागामार्फत सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील पालघर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयांतील पदांचा सुधारीत आकृतीबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय :

 

पालघर जिल्हयात ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करण्याकरिता १४ अतिरिक्त नवीन पदांच्या निर्मितीस उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता प्राप्त झाल्यानुसार पालघर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या खालिल तक्त्यात नमूद आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे. पालघर जिल्हा आयोगाच्या आस्थापनेवरील, शिपाई संवर्गातील २ मंजूर पदे मृत संवर्ग असल्यामुळे सदर सेवा गरजेनुसार बाह्यस्रोताद्वारे उपलब्ध करुन घेण्यात येतील. ४. क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कामकाजाचे स्वरुप, जबाबदारी, कामाचा व्याप इत्यादी विचारात घेऊन राज्य व जिल्हा संवर्गनिहाय कामाचे वाटप करण्याबाबत राज्य व जिल्हा आयोगाने आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.

 

 

  • अशासकीय पदे
    • अध्यक्ष
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 70,290/-
    • सदस्य
      • मंजूर पदसंख्या: 2
      • वेतनश्रेणी: 78,800/-
    • एकूण अशासकीय पदे: 3
  • शासकीय पदे
    • प्रबंधक (गट-ब)
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 91,5400-1,32,300
    • लघुलेखक उच्च श्रेणी (गट-ब)
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 91,6400-1,42,400
    • लघुलेखक निम्न श्रेणी (गट-ब)
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 91,5400-1,32,300
    • सहायक लेखाधिकारी (गट-ब)
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 91,5400-1,32,300
    • शिरस्तेदार (गट-क)
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 91,3600-1,22,800
    • सहाय्यक अधिक्षक (गट-क)
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 91,3500-1,12,400
    • अभिलेखापाल (गट-क)
      • मंजूर पदसंख्या: 1
      • वेतनश्रेणी: 98,2550-81,100
    • लिपीक टंकलेखक (गट-क)
      • मंजूर पदसंख्या: 2
    • शिपाई (गट-ड)
      • मंजूर पदसंख्या: 2
      • वेतनश्रेणी: 96,1990-63,200
    • एकूण शासकीय पदे: 11
  • एकूण पदे (अशासकीय + शासकीय): 14

वरील सर्व पदांसाठी पदभरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असल्याचे संकेत आहे. या बद्दलचे नवीन परिपत्रक खालील लिंक वर उपलब्ध आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्स साठी महाभरतीला जॉईन करा.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड