MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी
MAH MCA CET Admit Card
MAH MCA CET Admit Card: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, ते सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात.
cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील किंवा थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.
MAH MCA CET Admit Card : उमेदवारांना अॅडमिट कार्डवर अलिकडच्या काळातील छायाचित्र लावायचे आहे. नोंदणी करताना जे छायाचित्र पाठवले असेल, ते प्राधान्याने लावल्यास उत्तम. अॅडमिट कार्ड आणि ओळखपत्रासह उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MAH MCA CET कोणत्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा?
MAH MCA CET 2020 ही प्रवेश परीक्षा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स २०२०-२१ या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष या परीक्षेचे आयोजन करतो.
कोणत्या महाविद्यालयांमध्ये होतात प्रवेश?
महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांशी संलग्न पुढील महाविद्यालयांमध्ये सीईटी स्कोरवर प्रवेश होतात –
१) एमसीए कोर्स उपलब्ध असणाऱ्या सर्व शासकीय संस्था
२) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ विभाग
३) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ संलग्न संस्था
४) सर्व विनाअनुदानित एमसीए इन्स्टिट्यूट्स
सोर्स : म. टा.
Table of Contents