बीबीए, बीसीएची आणखी सीईटी ? मोठ्या प्रमाणात जागा राहणार रिक्त | MAH-B-BCA-BBA-BMS-BBM-CET-2024-25
MAH BCA, BBA BMS BBM CET 2024-25
MAH BCA, BBA BMS BBM CET 2024-25 Update
बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि बीसीए या अभ्यासक्रमांसाठी यावर्षी प्रथमच सीईटी प्रवेश परीक्षा घेतली. परंतु विद्यार्थ्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना ही सीईटी देता आली नाही. परिणामी बीबीए, बीसीएच्या जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या राहणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या राज्यभरातील महाविद्यालयांत १ लाख ८ हजार जागा असून परीक्षेला केवळ ४८ हजारच विद्यार्थी बसलेले आहेत. यामुळे पुन्हा सीईटी घेण्यासंदर्भात सरकार दरबारी विचारविनियम सुरु असून सीईटी सेलनेही सरकारकडे विचारणा केली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी संगणक उपयोजन (बीसीए), व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस) आणि बीबीएम अभ्यासक्रमांची नोंदणी महाविद्यालयाना बंधनकारक केली. तसेच या अभ्यासक्रमांचे प्रवेशही सीईटीच्या आधारे घेण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे या अभ्यासक्रमांचे प्रवेश यंदा सीईटींच्या गुणांच्या आधारे केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे सीईटी सेलने एप्रिल आणि मे मध्ये सीईटीसाठी अर्ज मागवले, ५६ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या नोंदणी केलेल्या विद्याथ्यर्थ्यांपैकी ४८ हजार १३५ जणांनी २९ मे रोजी सीईटी दिली. यांनतर बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी असल्याचे समजले आणि या अभ्यासक्रमांचे नावेही विद्यापीठांनी बदलली असल्याचे लक्षात आले. एफवाय प्रवेशाच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांना सीईटी दिली नसल्याने प्रवेश मिळणार नसल्याचे राज्यातील विद्यापीठातील महाविद्यालयांकडून सांगण्यात आले. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सीईटीच दिली नाही, अशा विद्यार्थी व पालकांनी उच्च शिक्षण विभागाकडे निवेदने दिली. विद्यार्थी संघटनांनी परत आणखी विशेष सीईटी घेण्याची मागणी केली.
सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ६० टक्क्यांहून अधिक प्रवेश जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी या अभ्यासक्रमाला सीईटीशिवाय प्रवेश होत होते. यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या प्रवेश परीक्षेची विद्यार्थ्यांमध्ये पुरेशी माहिती नसल्याने अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामुळे हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून झाल्यानंतर सीईटी सेलने यासंदर्भात सरकारदरबारी विचारणा केली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. सरकारने विशेष सीईटी घेण्याचे आदेश सीईटी सेलला दिल्यास पुन्हा परीक्षा होण्याचे संकेत आहेत. यावर येत्या दोन दिवसांत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निकाल जाहीर होणार
४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी यापूर्वी परीक्षा दिली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल सीईटी सेलच्या वतीने जाहीर केला जाणार आहे. या नंतर विशेष सीईटी झाल्यास त्या परीक्षेचा निकाल नंतर जाहीर करावा लागणार आहे
MAH BCA, BBA BMS BBM CET 2024-25 – Government of Maharashtra has established a State Common Entrance Test Cell (CET CELL) under Admission Regulating Authority (ARA) as per the provision in Section 10 of Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and Fees) Act, 2015, (Herein after called the Act). The Competent Authority shall conduct the ENTRANCE TEST FOR FIRST YEAR OF THREE / FOUR YEAR FULL TIME UNDER GRADUATE DEGREE COURSE in Bachelor of Computer Application (BCA)/Bachelor of Business Administration (BBA)/ Bachelor of Management Studies (BMS)/Bachelor of Business Management (BBM) for A Y 2024-25.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता बीसीए/बीबीए/बीएमएस/ बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याकरिता आज (दि. २१ मार्च) पासून अर्जनोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. बीसीए/बीबीए/बीएमएस / बीबीएम सीईटी २०२४ सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ११ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून बीसीए / बीबीए / बीएमएस / बीबीएम हे अभ्यासक्रम एआयसीटीईने आपल्या कक्षेत घेतले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना सीईटी लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्या अनुषंगाने या शैक्षणिक वर्षापासून बीसीए / बीबीए / बीएमएस/ बीबीएम या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. उमेदवार/पालक/संबंधित संस्था यांच्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet. org वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
BBA BMS Exam Date 2024
बी.बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम तसेच एमबीए आणि एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटीचे आयोजन केले आहे. सीईटी प्रवेश परीक्षेला अर्ज करण्यासाठी येत्या ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच दि. २७ ते २९ मे या कालावधीत सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सीईटी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी बी.बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता पहिल्यांदाच सीईटीचे आयोजन केले आहे. एमबीए आणि एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमासाठी सुद्धा ही सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमास सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावरील अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका लागू असणार आहे.
Table of Contents
Comments are closed.