LIC मध्ये नोकरीची संधी, पगार प्रतिमहिना ५७,००० रूपये

LIC Bharti 2020

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सहायक अभियंता (AE) आणि सहायक प्रशासाकिय आधिकारी (AAO) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण २१८ जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेद्वारांकडून यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार licindia.in या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख १५ मार्च अशी आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागेल. चार एप्रिल रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पूर्व परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पूर्व परीक्षेतून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. मुख्य परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या प्रोबेशन पीरियडवर घेतलं जाणार आहे. पुढे तो आणखी दोन वर्षापर्यंत वाढणार आहे.

  • वय – अर्ज करणाऱ्या उमेदवारांची एक फेब्रुवारी २०२० पर्यंत कमाल २१ वर्ष आणि किमान ३० वर्ष असावं. आरक्षित जागांसाठी ही मर्यादा दहा वर्षांनी वाढणार आहे.
  • शिक्षण – या दोन्हीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं शिक्षण पदवी पर्यंत असावं ही अट आहे. सहायक प्रशासाकिय आधिकारी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मास्टर्सची पदवी असायला हवी.
  • शुल्क – प्रत्येक अर्जासाठी ७०० रूपये शुल्क असणार आहे. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारोंना यामध्ये सूट असून त्यांना ८५ रूपये शुल्क भरावं लागेल.
  • पगार – या दोन्ही जागांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना ५७,०० रूपयांचं वेतन मिळणार आहे.

अधिक माहिती आणि अर्ज


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप