विधिचे विद्यार्थी उत्तीर्ण, मात्र तरी द्यावी लागणार परीक्षा!

Law students pass but will have to pass the exam!

Law students pass but will have to pass the exam! : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम सत्राच्या परीक्षा बंधनकारक करण्यात आल्या, तर प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील सत्राच्या परीक्षेच्या अनुषंगाने उत्तीर्ण करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) जाहीर केला. त्यानुसार राज्यातील विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. परंतु बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) विधिच्या सर्वच वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा बंधनकारक केल्या आहेत.

Law students pass but will have to pass the exam! : महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एका महिन्यात या परीक्षा घेण्याच्या सूचना बीसीआयने दिल्या. यामुळे विद्यापीठाने या परीक्षांबाबत आधीच आराखडा तयार करून पूर्वसूचना देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

विधि अभ्यासक्रमासंदर्भातील सर्व निर्णय बीसीआय घेते. ५ आॅक्टोबरला बीसीआयच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीनुसार, कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेशिवाय उत्तीर्ण करू नये, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठांना देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देणे बंधनकारक असून, या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला तो विषय सोडवल्याशिवाय पदवी देऊ नये, अशा सूचना बीसीआयने देशातील विद्यापीठे व महाविद्यालयांना दिल्या.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दरम्यान, मुंबई विद्यापीठाने याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असे मत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी मांडले.

‘पूर्वसूचना देणे गरजेचे’

विधि अभ्यासक्रमाबाबत सर्व निर्णय बीसीआय घेते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देणे बंधनकारक असून, यात विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास विद्यार्थ्याला तो विषय सोडवल्याशिवाय पदवी देऊ नये, अशा सूचना बीसीआयने दिल्या.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाने याबाबत विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असे मत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पवार यांनी मांडले.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड