सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती ला सुरवात!-Union Opposes CIDCO Recruitment!

Latest CIDCO Recruitment Updates

Latest CIDCO Recruitment Updates – शहररचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षापासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती. मात्र, आता सिडको व्यवस्थापनाने रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच १६० पदांसाठी ऑनलाइन परीक्षा पार पडली. त्यानंतर येत्या कालावधीत अर्थात चालू वर्षात विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांसाठीही टप्प्याटप्प्याने भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याने अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदे या वर्षात भरली जाण्याची शक्यता आहे.

Union Opposes CIDCO Recruitment!

सिडकोमध्ये सध्या मंजूर २७९७पदांपैकी १६१९ पदे रिक्त आहेत. यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. कामाचा हा भार आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता, कार्यक्षमता अबाधित ठेवण्यासाठी नव्या भरतीची गरज होती. याची दखल घेऊन सिडको प्रशासनाने २०२५ या वर्षात बॅकलॉक भरून काढण्याचे नियोजन केले आहे. सिडकोच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. बॅकलॉग मोठा आहे. सध्या १३० पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही महिन्यांत आवश्यकतेनुसार रिक्त पदे भरली जातील. व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिडको अंतर्गत भरती, अर्ज लिंक सुरु, नोकरीची संधी!! –  CIDCO Bharti 2025

तरुणांना संधी
अलीकडेच सिडकोमध्ये सहायक विकास अधिकारी व अभियंता संवर्गातील जवळपास १३० पदांसाठी ऑनलाइन परीक्षा पार पडली आहे. तिच्या माध्यमातून पहिला टप्पा पार पडला. मात्र, एवढ्यावरच न थांबता रिक्त असलेली विविध संवर्गातील पदे गरजेनुसार भरण्याचे सिडकोने ठरविले आहे. त्यानुसार येत्या काळात सिडकोत नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

पदोन्नती रखडली
लेखा विभाग, सुरक्षारक्षक, अग्निशमन दल, गट-ड संवर्ग आणि तांत्रिक क्षेत्रातील अनेक पदे सध्या रिक्त आहेत. विशेषतः लेखापाल, लेखा सहायक, लिपिक, अग्निशमन अधिकारी, अभियंते, क्षेत्र अधिकारी अशा विविध संवर्गात पदोन्नती रखडल्या आहेत. त्यामुळे उच्चस्तरीय पदांसाठी नव्या उमेदवारांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यादृष्टीने सिडकोने व्यापक नियोजन सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड