खुशखबर! लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता मिळणार १५ ऑगस्टला, निवड याद्या लवकरच जाहीर.. – Ladki Bahini Yojana Nivad Yadi, Beneficiary List
राज्यात अर्धा कोटी 'लाडक्या बहिणीं'चे अर्ज - Ladki Bahini Yojana Beneficiary List
सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या १५ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यांत जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत सरकार २१ ते ६५ वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. ही योजना १ जुलैपासून लागू झाली. तिचा जीआर जारी झाला. या महत्त्वकांक्षी योजनेचा राज्यातील ३.५० कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे. पण या योजनेचे पैसे केव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हा मुद्दाही स्पष्ट झाला आहे. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू झाली असून ४ ते ९ जुलै या सहा दिवसात सोलापूर जिल्ह्यातील २४ हजार महिलांनी ऑफलाइन तर अंदाजे ३२ हजार महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. तर राज्यातील अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता ४९ लाखांवर पोचली आहे. राज्य शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना १ जुलैपासून दिला जाणार असून प्रतिमहा दीड हजार रूपये त्या महिलांच्या खात्यात पेट जमा होणार आहेत. दुसरीकडे योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात आली असून १५ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना पहिल्या टप्यात तर १ ते ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या सर्वांना दुसऱ्या टप्प्यात लाभ दिला जाईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. पण. विधानसभा आचारसंहितेपूर्वी अर्जदार सर्वच लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभाची रक्कम वितरीत करण्याचेही नियोजन आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पालकमंत्र्यांची शिफारस महत्त्वाची व मुख्यमंत्री- माझी ताठकी बहीण योजनेच्या संनियंत्रणासाठी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीणमध्ये तालुकास्तरीय तर शहरात वॉर्डनिहाय समित्या नेमल्या जाणार आहेत. या समितीचे अध्यक्ष अशासकीय सदस्यच असणार असून त्यांच्याशिवाय दोन सदस्य देखील अशासकीयच असणार आहेत. अजूनपर्यंत अशासकीय सदस्यांची नावे तहसीलदारांपर्यंत पोचलेली नाहीत. पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार अशासकीय सदस्य निश्चित होणार आहेत. समितीत समावेश व्हावा म्हणून अनेकजण आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. कारण, समितीच्या माध्यमातून आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची त्यांना पायाभरणी करता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी योजनेचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची लगबग सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे महिलांना ऑफलाइन देखील अर्ज करायला सांगण्यात आले असून ते अर्ज अंगणवाडी सेविकांसह महा ई सेवा केंद्रचालक व अन्य घटकांकडून ऑनलाइन भरून घेतले जात आहेत. त्याची पडताळणी झाल्यानंतर यादी अंतिम करून लाभ जमा केला जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.