‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून रोज नवा आदेश मिळत असल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या आदेशात तालुकापातळीवर तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली. यासोबत वॉर्ड समितीदेखील कार्यरत राहणार असून, या समितीत राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी राज्य शासनाने पुन्हा एक नवा आदेश काढून विधानसभानिहाय समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विशेष म्हणजे, योजनेतील पात्र व अपात्र लाभार्थी ठरविण्याचा अधिकार केवळ प्रशासनाला राहणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. सध्या पाच लाख २१ हजार ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. साधारण ५० हजार अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने आले असून, हे अर्जदेखील ऑनलाइन अपलोड करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून ५ लाख २१ हजार महिलांनी अर्ज केले आहेत. गुरुवारी, २५ जुलै रोजी एकाच दिवशी २३ हजार ७२८ जणांनी अर्ज केले. मागील सात दिवसांत १ लाख १४ हजार ४३ महिलांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















