लाडकी बहीणसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट! – Ladki Bahin yojana Important Dates
Ladki Bahin yojana Important Dates
महाराष्ट्र सरकारने दि. १ जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजना लागू केली आहे. योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषीत केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकचे खाते आवश्यक आहे. परंतु, बहुतांशी बचत गटांचे खाते हे सहकारी बँकेत असल्याने लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरून देताना अथडळा निर्माण होत आहे. पोस्ट ऑफीस कार्यालयातही अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रूपये ऑगस्ट महिन्यापासून जमा होणार आहेत. ३१ ऑगस्ट ही अर्ज करण्याची अखरेची मुदत असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी लाडक्या बहिणींची मोठी तारांबळ उडत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- माझी लाडकी बहीण योजना, नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज कसा कराल, अँप सुरु!
- घरबसल्याच करा लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज, नारीशक्ती वरून कसा करायचा अर्ज पूर्ण माहिती पहा
- खुशखबर! – लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत सिलेंडर,योजनेची व्याप्ती वाढवली!
- नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज सूरू, पूर्ण स्टेप्स
या योजनेअंतर्गत बँक खात्यात रक्कम जमा करणार असल्याने बँक खात्यासंदर्भात योग्य कागदपत्र सादर करायची आहे. बहुतांश महिला या आपल्या घराजवळ असलेल्या पतपेढी, सहकारी बँक खात्याचे पुरावे घेऊन अर्ज भरण्यासाठी संबंधीत कार्यकर्त्यांकडे येत आहेत, अर्ज बाद होऊ नये या करिता राष्ट्रीयकृत बँकचे खाते यासाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे बहिणी आता खाते उघडण्यासाठी बँकेतही गर्दी करीत आहेत. वानवडीत माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून सदर योजनेसाठी महिलांचे अर्ज भरुन घेतले जात आहेत. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असावी. १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.