लाडकी बहीण योजना अंतर्गत बहिणींची कार तपासणी सुरू! – Ladki Bahin Yojana: Car Check Begins!
Ladki Bahin Yojana: Car Check Begins!
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या घरी कार आहे का नाही, याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. महिला व बालकल्याण विभागाने आरटीओकडून मिळालेली माहिती अंगणवाडी सेविकांना दिली असून, त्यांनी सव्वातीन हजार लाभार्थींची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे कार असल्यास संबंधित महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी अर्ज करताना महिलांकडून हमीपत्र घेण्यात आले होते, ज्यात कुटुंबात चारचाकी नसल्याची अट होती. मात्र, पडताळणी न करता लाभ देण्यात आला. सरकारने लाभार्थींना स्वयंप्रेरणेने लाभ सोडण्याचे आवाहन केले होते, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता प्रत्यक्ष घरोघरी तपासणी केली जाणार असून, नियमभंग आढळल्यास लाभ रद्द केला जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विभक्त राहणाऱ्या महिलांना लाभ मिळणार
सासरे, दीर किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही संबंधित महिला आपल्या पती व मुलांसह स्वतंत्र राहत असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
सव्वातीन हजार लाभार्थींची तपासणी
महिला व बालकल्याण विभागाने परिवहन विभागाकडून चारचाकी वाहनधारकांची यादी मिळवली आहे. या आधारे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करतील. महिलांच्या नावावर कार असल्यास त्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत.
तालुकानिहाय तपासणीसाठी आलेले अर्ज
- आर्वी: ३३३
- आष्टी (श): १३९
- कारंजा (घा): ११७
- देवळी: २४६
- वर्धा: १००४
- समुद्रपूर: ४२२
- सेलू: २८७
- हिंगणघाट: ६७४
५ एकर शेती व शासकीय नोकरी नको; उत्पन्न मर्यादा अडीच लाख
योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी, शासकीय नोकरी नसलेले व वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेले अर्जदार पात्र ठरवले होते. आता पडताळणीअंती निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना वगळले जाणार आहे.