महत्वाचे! – लाडकी बहीणच्या अर्जाच्या छाननीनंतर १० हजार अर्ज अपात्र! – Ladki Bahin yojana Application Form Verification
Ladki Bahin yojana Application Form Verification
बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin yojana Application Form Verification) जिल्हा प्रशासनाकडे २१ लाख ११ हजार अर्ज आले आहेत. छाननीनंतर सुमारे दहा हजार अर्ज अपात्र ठरले असून २० लाख ८४ हजार ३६४ इतक्या लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यातील पात्र बहिणींना निधीचे वाटप करण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी १५ ऑक्टोबर अंतिम मुदत होती. राज्यात १६ ऑक्टोबरपासून आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे अर्ज छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया स्थगित झाली. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पुन्हा छाननी सुरू झाली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
१५ ऑक्टोबरच्या शेवटच्या मुदतीपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे २१ लाख ११ हजा ९४६ इतके अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी सुमारे लाखभर अर्जाची छाननी बाकी होती. त्याची छाननी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत २० लाख ८४ हजार ३६४ इतक्या बहिणी लाडक्या ठरल्या आहेत. तर नऊ हजार ८१४ इतके अर्ज त्रुटींमुळे बाद झाले आहेत. पाच हजार ७२४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी आढळल्याने त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात अर्ज नाकारले आहेत. त्यांना त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आली आहे. तर एकूण प्रलंबित अजपैिकी बारा हजार अर्ज अद्याप छाननी बाकी आहेत. म्हणजेच सुमारे ९९.४३ टक्के अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. त्याशिवाय छाननी झालेल्या एकूण अजपिंकी ६९ हजार १७५ इतके अर्जाचे बँकेच्या खात्याशी आधार सिडिंग करणे बाकी आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अंगणवाडी सेविकांनी योजनेची सद्यःस्थिती निदर्शनास आणून द्यावी लाडकी बहीण योजनेसंदर्भात समाजमाध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थी महिलांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यपद्धतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेची सद्यः स्थिती निदर्शनास आणून देण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.