20 लाख बहिणींकडून पैसे घेणार परत! लाडक्या बहिणींना बसणार झटका!

राज्यातील महायुती सरकारला भरघोस मतांनी विजयी करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही छाननी सरसकट सर्व लाभार्थ्यांची करण्यात येणार नाहीये तर तक्रार येणाऱ्या महिलांच्या अर्जांचीच केली जाणार आहे. अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज यातून बाद केले जातील. निकषानुसारच लाभ दिला जाणार आहे. पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे. निकषांचा विचार केला तर राज्यातील लाखो महिलांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझा लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेच्या अंतर्गत जवळपास अडीच कोटी महिलांना लाभ मिळत आहे. यामध्ये शेतकरी महिलांचा सुद्धा समावेश आहे. पण आता निकषांनुसार या महिलांना मिळणाऱ्या लाभातील पैशांना कात्री लागण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Update 2025 News

 

राज्य सरकारने आधी लाडक्या ठरवलेल्या महिला आता नावडत्या झाल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. विधानसभेच्या आधी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेतून दोन कोटींहून अधिक महिलांना साडेसात हजार रूपये देण्यात आले होते. त्या वेळी विरोधकांनी ही योजना निवडणुकीसाठीच आहे. यानंतर बंद होईल असे म्हटले होते, तर निकषांच्या नावाखाली काटछाट केली जाईल, अशी शक्यता वर्तवली होती. आता ही शक्यता सत्यात येत असून राज्य सरकारने पाच निकषांवर अर्जाची छाननी करणे सुरू केले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यामुळे याच्याआधी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या. त्या जर निकषांत बसल्या नाहीत तर त्या अपात्र ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेश सरकारने ‘लाडली बहना’ सुरू केली. तेथे भाजपला मोठे यश मिळाले. यानंतर तत्कालिन शिंदे सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आखली आणि महिलांना १५०० रूपये थेट खात्यावर देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने तब्बल कोणतेही निकष न लावता २ कोटी ६३ हजार महिलांचे अर्ज स्वीकारले, तर २ कोटी ४६ लाख महिलांना खात्यावर थेट पाच हप्ते वर्ग केले. २ कोटी ५२ लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले होते; पण आचारसंहितेच्या कारणास्तव या योजनेचे हप्ते थांबवण्यात आले होते.

आता पुन्हा एकदा पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली असून डिसेंबर महिन्याचा हप्ताही देण्यात आला आहे.आजअखेर २१ हजार ६०० कोटी रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत.

६ हजारांच्या लाभाला कात्री

या माहितीप्रमाणे ‘डीबीटी’ योजनेतील महिला अर्जदार १० लाख ९० हजार ४६५ होत्या. यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी १ लाख ७१ हजार ९५४ पात्र ठरल्या होत्या. ‘नमो शेतकरी सहासन्मान योजनेंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात. या योजनेसाठी १९ लाख २० हजार ८५ पैकी १८ लाख १८ हजार २२० महिला योजनेसाठी पात्र ठरल्या. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार रुपये ऐवजी १२ हजार रुपये प्रति शेतकरी महिला देण्यात येणार आहे. यामुळे अनेक शेतकरी महिलांच्या सहा हजारांच्या लाभाला आता कात्री लागणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड