रक्षाबंधनाच्या ४ दिवस आधीच महाराष्ट्रातील बहिणींच्या खात्यात ओवाळणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थेट लाभ हस्तांतरणास सुरुवात झाली असून जुलै व ऑगस्ट महिन्याचा एकत्रित लाभ ३००० रुपये राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती त्यांच्या द्विटर हॅण्डलवरून जाहीर केली. “रक्षाबंधनाचा उत्सव सुरू” असं म्हणत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.

आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजार पेक्षा जास्त महिलांनी नाव नोंदणी केली असून, यापुढेही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू राहणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. तसेच, सर्व माता भगिनींनी आपले बँक खाते आधार कार्डला लिंक करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. १६ ऑगस्टपर्यंत एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील बहिणींना दिलेला शब्द सरकारने पाळला आहे. योजनेचे पैसे थेट खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे. निवडणुकीनंतरही आम्ही ही योजना सुरूच ठेऊ.- मुख्यमंत्री
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















