राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही! – Ladki Bahin Payment New Update

Ladki Bahin Payment New Update

आगामी महापालिका निवडणूक झाल्यावर महायुती सरकार अपात्र बहिणींची यादी वाढवून ही योजना बंद करेल, अशी भीती शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना आदिती तटकरे यांनी ‘स्वत:हून पैसे परत देणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जातील, पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. Ladki Bahin Payment New Update  ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. चार ते साडेचार हजार लाडक्या बहिणींनी ही योजना बंद करण्यात यावी, असे अर्ज केले आहेत. ही यादी प्रत्येक दिवस वाढत आहे. या योजनेची पडताळणी करताना कुटुंबाचे उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभाग, तर घरात चार चाकी वाहन आहे का हे पाहण्यासाठी परिवहन विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्याचा धसका अनेक लाडक्या बहिणींनी घेतला.

Ladki Bahin Yojana News Update

काही बहिणींनी स्वत:हून ही योजना नको, असे अर्ज केले आहेत. त्यांना देण्यात आलेला पाच महिन्यांचा लाभ सरकारी तिजोरीत शासकीय चलनाने परत घेतला जाणार आहे. स्वेच्छेने योजना नाकारणाऱ्या लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार आहेत. पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही, असा दावा आदिती तटकरे यांनी केला. दरम्यान, अपात्रतेचा शिक्का बसणाऱ्या प्रत्येक बहिणीकडून सरकारी लाभ परत घ्यावा लागणार असल्याचा ठाम विश्वास या विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड