नवीन लाडक्या बहिणींची नोंदणी प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज कसा करायचा? – Ladki Bahin Online Apply

Ladki Bahin yojana online apply महाराष्ट्र link

Ladki Bahin yojana online apply महाराष्ट्र link – विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करून राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. निवडणुकीची घोषणा होताच योजनेच्या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली. निवडणुकीनंतर नोंदणी प्रक्रिया सुरू करणे अपेक्षीत होते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून नवी नोंदणी बंद असल्याने सांगा साहेब लाडक्या बहिणींची नोंदणी कधी सुरू होणार, असा प्रश्न महिला विचारत आहेत. जुलै २०२४ पासून महाराष्ट्र शासनाने २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमध्ये सुरुवातीला दरमहा दीड हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले. निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेसाठी महिलांनी नोंदणी केली.

ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link

लाडकी बहीण योजने साठी नवीन अर्ज करण्यासाठी पात्रता तपासा:

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठरावीक मर्यादेपेक्षा कमी असावे (उदा. ₹2.5 लाखांपर्यंत).
  • सरकारी कर्मचारी नसावा.
  • आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मतदार ओळखपत्र आवश्यक.

 

तसेच अर्ज सादर करण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रांची तयारी करा:

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • मतदार ओळखपत्र / राशन कार्ड
  • बचत खाते असलेली बँक पासबुक
  • मोबाईल क्रमांक

 

आगामी निवडणुकीत फटका ?
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यात लाडक्या बहिणीचा मोठा हातभार लागला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच पोर्टलवर नोंदणी सुरू होणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तसे न झाल्यास आगामी निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि पोर्टलवर नोंदणी बंद करण्यात आली. तेव्हापासून नोंदणी बंद असल्याने वयाची २१ वर्ष पूर्ण झालेल्या युवती पात्र असताना या योजनेपासून वंचित आहेत.
पोर्टल सुरू असले तरी यावर केवळ त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे बालकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, नोंदणी होऊन त्रुटी दूर झाल्या नसलेल्या अनेक महिला अनुदानासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

Ladki Bahin yojana online apply महाराष्ट्र link – ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी आहे :

  • https://ladkibahinyojana.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या (किंवा MahaDBT पोर्टलवरून).
  • नवीन नोंदणी करा (Registration).
  • लॉगिन करून लाडकी बहिण योजना निवडा.
  • अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
  • सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करा व त्याची प्रिंट काढून ठेवा.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड