महत्वाचे! लाडकी बहीणचे निकष बदलणार सध्या १,५०० रुपयेच; कुटुंबातील केवळ दोनच महिलांना लाभ मिळणार!
Ladki Bahin New Rules
सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या राज्यात भाजप-महायुतीच्या अभूतपूर्व विजयात ‘लाडकी बहीण’ योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याने महायुतीचे नवे सरकार ही योजना पुढे चालू ठेवणार आहे. मात्र, त्यातील एक-दोन निकष बदलले जाण्याची शक्यता आहे. या योजनेतून दरमहा २,१०० रुपये देण्याची ग्वाही महायुतीने प्रचारादरम्यान केली होती. मात्र, तूर्तास १,५०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो. शिवाय, कुटुंबातील दोनच महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा विचार सुरू झाला आहे. या योजनेतून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील २ कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पाच महिन्यांची रक्कम सरकारने जमा केली.
परिणामी, महिलांची मतांची टक्केवारी वाढली आणि महायुतीच्या बाजूने जोरदार मतदान झाले. महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास ही योजना बंद केली जाईल, असा प्रचार महाविकास आघाडीकडून करण्यात आला. मात्र, ‘लाडकी बहीण‘ योजना सुरू राहणार असली तरी या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिस्त लावण्याच्या धोरणांतर्गत या योजनेत बदल केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘लाडकी बहीण’ योजना महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी घोषित केली. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक साहाय्य देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा, असे सध्याचे या योजनेचे निकष आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App