लाडकी बहीण जून महिन्याचा हप्ता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू!- Ladki Bahin June July 2025 Payment
Ladki Bahin June July 2025 Payment
Ladki Bahin June July 2025 Payment – लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने पात्र महिलांच्या खात्यात 1500 जमा केल्याने जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच बँकांबाहेर रांगा लागल्या होत्या आणि पैसे काढण्यासाठी महिलांनी तासनतास प्रतिक्षा केली. योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी बँकांतील अकार्यक्षमता अपुरी कर्मचारी संख्या आणि स्लो सिस्टम यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी महिलांना तासभर उभं राहावं लागलं. काही जेष्ठ महिलांना तर बसायचीही व्यवस्था नव्हती, अशी तक्रारही त्यांनी केली.
बँक व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार, सकाळपासून गर्दीचे प्रमाण खूप वाढले आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र एकाच वेळी हजारो महिलांनी येऊन गर्दी केली असल्यामुळे प्रक्रिया मंदावली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये समाधान जरूर आहे, मात्र या योजनेंतर्गत लाभ देताना पायाभूत सोयीसुविधा आणि व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे चित्र समोर आले आहे.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ४ जुलै रोजी याबाबतची माहिती दिली होती. ट्वीट करत अदिती तटकरे यांनी ‘जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु झाला आहे. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, असे म्हटले होते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जून-जुलैचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता
जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जूनचा हप्ता स्वतंत्रपणे जमा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जून आणि जुलैचे हप्ते एकत्रितपणे, म्हणजेच ३००० रुपये, जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही असा अनुभव आल्याने ही शक्यता नाकारता येत नाही. तरीही, सरकारने याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.
सरकारची जबाबदारी
लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे. दरमहा मिळणारी १५०० रुपयांची रक्कम अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत आहे. मात्र, हप्त्यांमध्ये होणारा विलंब महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण करत आहे. सरकारने याबाबत तातडीने स्पष्टता आणावी आणि हप्ते नियमितपणे जमा करावेत, अशी अपेक्षा आहे. जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळाले, तर महिलांना ३००० रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल.