संक्रांत झाली लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हफ्ता कधी आणि किती येणार? नवीन अपडेट! – Ladki Bahin January 2025 Payment
Ladki Bahin January 2025 Payment
आपल्याला माहीतच असेल जुलै 2024 पासून सुरू झालेली महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या योजनेचा फायदा आतापर्यंत दोन कोटी ५२ लाख महिलांना झाला आहे. डिसेंबर 2024 मध्ये सरकारने महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले. मात्र, जानेवारी महिना संपत असतानाही अद्याप नवीन हप्ता मिळालेला नाही, यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे महिलांना एकूण ९००० रुपये मिळाले आहेत. डिसेंबरमधील हप्ता मिळाल्यानंतर महिलांना अपेक्षा होती की संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने जानेवारीचा हप्ता जमा होईल. पण, अद्याप सरकारने याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे महिलांकडून प्रश्न विचारले जात आहेत, “जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार?”
महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना १५०० रुपयांच्या हप्त्याऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात या योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, “ज्या महिलांना या योजनेसाठी पात्रता नाही, त्यांनी स्वतःहून योजना सोडावी,” असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. त्यांनी यावर खुलासा करताना सरकारने आतापर्यंत दिलेली रक्कम परत मागणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलांविरोधात तक्रार आल्यास कारवाई होईल, असा इशाराही सरकारने दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. जानेवारी २०२५ चा हप्ता १५०० रुपयेच असेल, कारण निधी वाढवण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असे सध्या तरी चित्र आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महिला मतदारांना खूश ठेवणे हे सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यामुळे जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होईल, अशी महिलांना अपेक्षा आहे. तसेच योजनेच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेवरही सरकार भर देणार आहे. महिला मतदारांनी योजनेला मोठा प्रतिसाद दिला असला तरी सरकारने वेळेवर हप्त्याचा पुरवठा न केल्यास त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यामुळे आता पुढील जानेवारी चा हफ्ता लवकरच अपेक्षित आहे. या संदर्भतील नवीन महत्वाची बातमी लवकरच प्रकाशित होईल.पुढील अपडेट साठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.