लाडक्या बहिणींना सवलतीत मिळणार घर, खरेदीत मिळणार मोठा डिस्काउंट!
ladki bahin home purchase benefits
‘MCHI CREDAI’ ठाणे यांच्यावतीने ठाण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या मालमत्ता प्रदर्शनात ज्या महिला चार दिवसांत फ्लॅट बुकिंगची २० टक्के रक्कम भरतील, त्या बहिणींना फ्लॅट खरेदीत सवलत दिली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गुरुवारी दिली. यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार असून, यामध्ये ३० लाखांपासून ते तीन कोर्टीच्या किमतीची घरे उपलब्ध आहेत. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा, जय वोरा उपस्थित होते. यंदाचे प्रदर्शन ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ढोकाळी येथील हायलैंड गार्डन मैदानावर भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. प्रदर्शनात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा, पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश, मोफत पार्किंग, वॉलेट पार्किंगचाही पर्याय, ८० हून अधिक नामांकित बिल्डरांचे १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल, १५ हून अधिक वित्तसंस्था, २५ हजारांहून अधिक घर खरेदीदारांची उपस्थिती, वातानुकूलित प्रशस्त मंडप, असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय, गृहसंकुलांसाठी स्पर्धा ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना दीड लाखांपासून ते ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App