पात्र बहिणींना लाभ मिळण्याची खबरदारी घेण्याचे न्यायालयाचे आदेश! – Ladki Bahin Benifits Court Order 2025

Ladki Bahin Benefits Court Order 2025

‘लाडकी बहीण’ योजनेत कोणत्याही प्रकारचा बदल अथवा सुधारणा करण्यात आल्यास पात्र असलेल्या महिलांना लाभ मिळेल यादृष्टीने योग्य ती पावले उचलण्याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज भरताना महिलांना येत असलेल्या अडचणींबाबत ‘प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशन’ ने अॅड. सुमेधा राव व अॅड. रुमाना बगदादी यांच्यामार्फत जनहित याचिका केली होती. ‘पूर्वी महिलांना साह्य करण्याकरिता ११ संस्था नेमण्यात आल्या असल्या तरी नंतर अर्जदारांची संख्या घटल्याने सरकारने ६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या जीआरप्रमाणे केवळ अंगणवाडी केंद्रांनाच अर्ज स्वीकारण्यास अधिकृत केले आहे.

Ladki Bahin Benefits Court Order 2025

शिवाय योजनेत सुधारणा/बदल झाले असल्याने आता नव्याने अर्ज भरण्यास पात्र महिलांना अडचणी येऊ शकतात’, अशी भीती अॅड. राव यांनी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर व्यक्त केली. तर, ‘एकूण दोन कोटी ५१ लाख ६६ हजार ९१२ अर्ज आले. त्यानंतर अजाँची पडताळणी केल्यावर त्यातील दोन कोटी ४३ लाख ६२ हजार ३३० अर्ज पात्र ठरले आणि सुमारे ९० हजार अर्ज अपात्र ठरले. महिलांना अर्ज भरताना साह्य मिळण्यासाठीही आवश्यक त्या सुविधा दिल्या आहेत’, असे सरकारी वकिलांनी महिला व बालकल्याण विभागाच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर खंडपीठाने सरकारला हा आदेश देऊन याचिका निकाली काढली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड