खुशखबर, आता माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज घरबसल्या भरता येणार, नवीन अपडेट जाहीर – Ladki Bahin Application Form Mobile

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून महिला ऑनलाइन घरी बसल्या दाखल करू शकतात. त्यासोबतच अंगणवाडीसेविका, बचतगट, समूह संघटक, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून महिलांना अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरून देण्यासाठी प्रत्येकी अर्ज ५० रुपये त्यांना दिले जाणार असल्याने महिलांनी अर्ज भरण्यासाठी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची व्याप्ती वाढविण्यासोबतच अंमलबजावणीत सुटसुटीतपणा यावा, या दृष्टीने शासनाने नवीन शासन निर्णयाद्वारे बदल केले आहेत. गाव पातळीवर ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून, समितीमार्फत दर शनिवारी चावडी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन होणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे अर्ज ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून महिला ऑनलाइन घरी बसल्या दाखल करू शकतात. सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत अर्ज देण्याची सुविधा केली आहे. 

घरबसल्याच करा लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज, नारीशक्ती वरून कसा करायचा अर्ज पूर्ण माहिती पहा

Ladki Bahin Yojana

या योजनेचे अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची कोणतीही फरपट होऊ नये, त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागू नये, यादृष्टीने ‘नारी शक्ती दूत’ ॲपच्या माध्यमातून मोबाईलद्वारे महिलांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, या दृष्टीने शासनाने विविध पावले उचलले आहेत. अर्ज भरताना आधारकार्ड, बँक खात्याशी संबंधित माहिती अचूक भरावी. जेणेकरून लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ होईल. योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळेल. याबाबत ग्रामस्तरावर खात्री करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सर्व ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी व क्षेत्रीय यंत्रणांना दिल्या आहेत.

 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोणत्या महिला असणार पात्र? 

– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला

– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा

– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक

– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे

– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल

– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड