पुण्यात १० हजार लाडक्या बहिणी अपात्र, प्रसिद्ध यादीतील या २० लाख ८४ हजार ३६४ महिलांना मिळाला लाभ!
Ladki Bahin Apatra Yadi
‘लाडकी बहीण’ योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी पुन्हा सुरू करण्यात आली असून, त्यात सुरुवातीपासून आतापर्यंत तब्बल १० हजार अर्ज अपात्र ठरले आहेत. एकूण अर्जदारांपैकी ६९ हजार १७५ अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार ३६४ महिलांना लाभ मिळाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली. गिरासे म्हणाले की, महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला. अल्प कालावधीत या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. (Ladki Bahin Apatra Yadi)
पुणे जिल्ह्यातील २० लाख ८४ हजार अर्जदारांना योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने दिली. योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाख ११ हजार ३६३ मंजूर करण्यात आले होते. अजूनही १२ हजार अर्जाची छाननी बाकी आहे. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. तसेच ५ हजार ८१४ अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अपात्रांकडून पैसेही परत
लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी अपात्र ठरत आहेत. त्या अपात्र लाभार्थ्यांनी पैसे देखील परत केले आहेत. तसेच अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली.
या निकषांची पडताळणी
लाडकी बहीण योजनेत उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये आहे. तसेच लाभार्थींनी अन्य शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ही अट आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अटींचे पालन झाले की नाही, त्याची छाननी रखडली होती. विधानसभा निवडणुकीनंतर अपात्र लाभार्थ्यांवर राज्यभरात कारवाईसुद्धा सुरु झाली आहे. तसेच यापुढेही अर्जांची पडताळणी सुरुच राहणार असल्याचे महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. या योजनेमुळे महायुतीला मोठा कौल राज्यातील जनतेने दिला. भाजपने सर्वाधिक १३२ जागा मिळवल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. महायुतीला २३० जागा मिळाल्या. तसेच आता काही अपक्ष आमदारही महायुतीसोबत आले आहेत.