JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

गुड न्यूज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्चचे 1500 रुपये जमा, एप्रिलचे पैसे कधी मिळणार? – Ladki Bahin payments 2026

Ladki Bahin payments 2026 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपये दिले जातात. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम 24 मार्चला जमा करण्याती आली होती, त्यानंतर महिलांना पैसे मिळाले नव्हते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सरकारकडून ई केवायसी प्रक्रिया राबवण्यात आलेली. यामध्ये चुकीचे पर्याय निवडणाऱ्या महिलांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर ती प्रक्रिया संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या मार्च महिन्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

Ladki Bahin payments 2026
लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे मिळाल्यानंतर आता एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली होती तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 40 लाखांच्या दरम्यान होती. मात्र, लाखो महिलांनी ई केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्यामुळं त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा मिळतात तर पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात.

 

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड