कृषी सेवक भरती – २०२३-२४ मधील कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर । Krushi Vibhag Document Verification Schedule
Krushi Vibhag Document Verification Schedule
Krushi Vibhag Document Verification Time Table
Krushi Vibhag Document Verification Schedule: इंस्टीटयूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन यांच्यामार्फत पेसा क्षेत्रातील व पेसा क्षेत्राबाहेरील कृषि सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक पदासाठीची ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दि.१६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आली होती. उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जातील माहितीच्या आधारे व सर्वसाधारण गुणवत्ते यादी नुसार अंतरिम निवड यादी तयार करणेत आलेली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर निवडसूचीमध्ये कृषि सेवक या पदासाठी अंतरिम निवड यादीमध्ये आपले नाव आपल्या नावासमोरील नमुद प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. हे पत्र म्हणजे आपल्या नियुक्तीचे आदेश नसून अंतरिम निवड यादीतील संभाव्य निवड होणा-या उमेदवारांचे कागदपत्राची तपासणी करण्यासाठी दिलेले पत्र आहे. हे पुनःश्च स्पष्ट करण्यात येत आहे. आपण आपली आवश्यक असणारी खालील सर्व मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीच्या दोन साक्षांकीत संचासह दिनांक २४/५/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता या कार्यालयात उपस्थित रहावे. याबाबतचा कोणताही प्रवासभत्ता अनुज्ञेय असणार नाही.
List Of Documents Required For Krushi Sevak Bharti
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
उमेदवारांनी तपासणीसाठी सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे
१. शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण केल्याचे प्रमाणपत्र (कृषि पदविका / कृषि पदवी )
२. संगणक हाताळणीबाबत D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा ० स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर पैकी कोणतीही एक परिक्षा उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MSCIT परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
३. वयोमर्यादा तपासणी करीता शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/एस.एस.सी.चे प्रमाणपत्र (स्कूल लिव्हींग सर्टीफीकेट मूळ प्रत )
४. ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे त्या बाबतचे जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र.
५. शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषि पदविका/पदवी किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मिळालेली अशी इतर कोणतीही शैक्षणिक अर्हता / उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास प्रमाणपत्र व गुणपत्रक
६. महाराष्ट्र नागरीसेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना अ
७. सन २०१८-१९ साठी वैध असलेले उन्नत आणि प्रगत (नॉनक्रिमिलेअर) गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी तपासणी करुन दिलेले प्रमाणपत्र. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांका पर्यंतचे प्रमाणपत्रच ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.
८. माजी सैनिक असल्यास संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र व डिश्चार्ज बुक
९. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी (Domicile) असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
१०. उमेदवार प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त असल्याबाबतचे जिल्हा पुनर्वसन अधिका-यांचे प्रमाणपत्र.
१०. उमेदवार प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त असल्याबाबतचे जिल्हा पुनर्वसन अधिका-यांचे प्रमाणपत्र.
११. उमेदवार खेळाडू असल्यास राज्यस्तर / राष्ट्रीयस्तर / आंतरराष्ट्रीयस्तर मधील प्राविण्य असल्यास कोणते स्थान प्राप्त केले आहे. त्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र व सदर प्रमाणपत्र पडताळणी केल्याचा सक्षम प्राधीका-याचा दाखला मुळ प्रत
१२. उमेदवार अंशकालीन कर्मचारी असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचा दाखला.
१३. ऑनलाईन अर्ज दाखल करतेवेळी शुल्क भरणा केल्याचा पुरावा तसेच ऑन लाईन अर्जाची साक्षांकीत प्रत.
१४. दिव्यांग उमेदवार असल्यास दिव्यांगात्वाचे प्रमाण ४० टक्के असणे आवश्यक असून तसे संबधित जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्राधिकृत मंडळाचे संगणकीकृत मूळ प्रमाणपत्र. (SADAREM प्रमाणपत्र)
१५. अनाथ असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधीका-याचे प्रमाणपत्र
१६. आत्महत्याग्रस्त शेतक-याचे पाल्य असल्यास त्याबाबतचे सक्षम प्राधीका-याचे प्रमाणपत्र
१७. नावात बदल झाला असल्यास त्याबाबतचे अधिसूचित राजपत्र
१८. अलिकडील काळातील पासपोर्ट / पारपत्र आकाराचा एक फोटो तसेच उमेदवारांचे ओळखपत्र (आधार कार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र / वाहनपरवाना इ. पैकी एक)
District Wise Krushi Sevak DV Dates
1 | अमरावती विभाग-कृषी सेवक भरती – २०२३-२४ मधील कागदपत्र पडताळणीबाबत जाहीर प्रकटन | परिक्षेचा निकाल | 14/05/2024 | 0.19 |
Download Kolhapur Krushi Sevak Document Verification Schedule
Table of Contents
Comments are closed.