कृषी सेवेच्या २५८ जागांसाठी परीक्षेचा मार्ग मोकळा, लागा तयारीला!! । Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Offline Application 2024

Krushi Vibhag Bharti 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेण्यात येणाऱ्या कृषी विभागातील २५८ जागांसंदर्भातील परीक्षेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासन सेवेतील एमपीएससी कक्षेतील सरळ सेवेच्या पदांच्या मागणीचे पत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्याबाबत शासनाने निर्णय जारी केला आहे. त्यामुळे एमपीएससीमार्फत कृषी विभागातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आले असून, उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

या परीक्षेबाबत तांत्रिक अडचणी येत असल्याने २० ऑक्टोबर २०२२चे परिपत्रक राज्य शासनाकडून रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलल्यानंतर कृषी विभागाच्या २५८ जागा यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ऑक्टोबर २०२२चे ते परिपत्रक आता रद्द करण्यात आले आहे. हे परिपत्रक रद्द केल्यानंतर आता कृषी विभागाच्या २५८ जागांसंदर्भात लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहितीही पुढे आली आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. त्याशिवाय कृषी विभागातील २५८ जागांचा सुद्धा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारची जाहिरात लवकर जारी केली जाईल, असेही यात म्हटले आहे. नुकतेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर २५ ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्याचबरोबर कृषी विभागाच्या २५८ जागांची भरती करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र संयुक्त पूर्व परीक्षेच्या ‘गट ब आणि गट क’च्या पंधरा हजार जागा भरण्याची तिसरी मागणीदेखील विद्याथ्यर्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानंतर दोन मागण्या मान्य झाल्यावर रोहित पवार, रुपाली पाटील आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. संयुक्त पूर्व परीक्षेच्या माध्यमातून पंधरा हजार जागा भरण्याच्या तिसऱ्या मागणीबाबत येत्या सात दिवसांत शरद पवार मुख्यमंत्री आणि संबंधित व्यक्तींची भेट घेतील, असे आश्वासन रोहित पवारांनी विद्यार्थ्यांना दिले होते. त्याचबरोबर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनीदेखील विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला आणि या तिसऱ्या मागणीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित पवार, अभिमन्यू पवार यांचे प्रतिनिधी आणि रुपाली पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जोपर्यंत तिसऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय काही विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतला होता.

 


मित्रांनो, कृषी विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट समोर आला आहे. कृषी विभागातील राजपत्रित अधिकारी ‘गट अ’ आणि ‘गट ब’मधील मंजूर २५८ पदांचा, रिक्त असलेल्या अन्य १०१८ पदांचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करावा, अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली आहे. या संदर्भात त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उमेदवारांकडून देण्यात आला आहे. अरविंद कायंदे, संग्राम नरळे, आकाश माने, रोहिणी भाकरे, श्रेया नांगरे, विराज दंडवते, प्रवीण पाटील आदींनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विभागात एक हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार असूनही एक व्यक्ती दोन-तीन पदांची जबाबदारी सांभाळत आहे. २०२१च्या २०३ आणि २०२२च्या २१४ जागांसाठी झालेल्या भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. कृषी विभागाने २५८ जागांचे मागणीपत्र ‘एमपीएससी’ला देऊनही जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. या २५८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करून त्यांचा समावेश २५ ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत करावा; अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोनदा मागण्या मांडल्या असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, कार्यवाही झालेली नाही. सरकारने तातडीने कृषी विभागातील हक्काच्या जागा एमपीएससीद्वारे न भरल्यास अनेक उमेदवारांचे वय उलटण्याची भीती आहे. अनेकांचे पुढील आयुष्य, विवाह त्यावर अवलंबून आहेत,’ याकडे या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. राज्यात किमान दीड लाख उमेदवार स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. ते व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे दहा लाख मतदार वेळप्रसंगी मतदानाद्वारे आपली ताकद दाखवून देतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.


 

Krushi Vibhag Bharti 2024: Krushi Vibhag has been recently published new recruitment notification of vacant Posts. The name of this recruitment is “Managing Director”. There is a 01 vacant post available. These applications are to be submitted directly for offline Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is 08 Days (01st of August 2024). For more details about Krushi Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

कृषी विभाग अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (01 ऑगस्ट 2024) आहे.

 

  • पदाचे नावव्यवस्थापकीय संचालक
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा – कृषि संचालक, आत्मा कृषि आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे-५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 दिवस (01 ऑगस्ट 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/

Krushi Vibhag Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
व्यवस्थापकीय संचालक 01

How To Apply For Krushi Vibhag Recruitment 2024 

  • सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस (01 ऑगस्ट 2024) आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For krishi.maharashtra.gov.in Notification 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/gmACU
✅ अधिकृत वेबसाईट
https://krishi.maharashtra.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

17 Comments
  1. MahaBharti says

    Latest Update

  2. Sujata Rajendra khairnar says

    Agriculture chya last year la apply kru shkta ka

  3. विराज मुळीक says

    तुम्ही पात्रता सांगत नाही, का ???

  4. Supriya khaire says

    Qualifications kay b ahe

  5. Anil Parmeshwar Ghanghav says

    B.sc agriculture

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड