कृषी अभ्यासक्रम प्रवेशाचे वेळापत्रक 2024 जाहीर!- Krishi Vidyapeeth CET Application Form Dates

Krishi Vidyapeeth CET Application Form Dates 2024

Krishi Vidyapeeth CET Application Form Dates

 

तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उतीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठीचे वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत तीन वर्षांच्या इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून प्रथमच पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्यास सुरूवात झाली आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज २६ जून ते ५ जुलैपर्यंत करता येणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी १३ जुलै रोजी जाहीर होऊन पहिली फेरी १४ जुलै रोजी सुरु होणार आहे. प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ जुलै असणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 


 

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळातर्फे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २०२४ चे (पीजी सीईटी २०२४) आयोजन करण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पीजी सीईटी २०२४ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १ ते २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर याची ६ मार्चपर्यंत मुदत वाढविण्यात आली. आता या प्रवेश परीक्षेसाठी पुन्हा ७ ते २० मार्च अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर २२ मार्चपर्यंत परीक्षा शुल्क भरता येणार आहे. प्रवेश परीक्षेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले असून ३१ मे ते २ जून कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहे. अधिक माहितीसाठी https://www.mcaer.org या संकेतस्थळावर भेट द्यावी, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी दिली.

 


 

Krishi Vidyapeeth Exam Dates  : The Common Entrance Test 2022 for admission to postgraduate courses in four agricultural universities in the state will be held from 11th to 13th June. Further details are as follows:-

राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २०२२ ही ११ ते १३ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे.

कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सामाईक प्रवेश परीक्षा २०२२’ ही ११ ते १३ जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना २८ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्यात ही परीक्षा १७ केंद्रावर होणार आहे. या परीक्षेसाठी संबंधित विद्याशाखेचे पदवीधर आणि २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी पात्र राहणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या नमुन्यातील ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या http://www.mcaer.org संकेतस्थळावर भरायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचणे गरजेचे असल्याचे परीक्षा मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

  • कृषी अभियांत्रिकी विषयातील एमएस्सी प्रवेश परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात ४ जून होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.
  • गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील चारही कृषी विद्यापीठाची महाविद्यालय बंद होती.
  • यावर्षी हा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरळीत वेळेवर होऊन महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरळीत सुरू होऊन नेहमीप्रमाणे अध्ययन सुरू होईल अशी शक्यता आहे.
  • ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना समस्यांना तोंड दयावे लागत होते.
  • ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा नाहीत त्यामुळे त्याचा परिणाम जाणवत होता.
  • आता या प्रवेश परीक्षा झाल्यावर पुढिल प्रक्रिया सुरळीत होईल.

महाराष्ट्र राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषी विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषी अनुसंधान परीषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी नुकताच जाहीर केला. सध्या करोनामुळे राज्यातील सर्वाधिक जिल्हे बाधित आहेत. त्यातील बहुतांश जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे कृषी विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

परीक्षेच्या नियोजनात प्रामुख्याने कृषी पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल, तर व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार शक्यतो जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल.

तसेच मित्रानो, कृषी तंत्र निकेतन (तीन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे १०० टक्के मूल्यमापन अंतर्गत गुणांनुसार करण्यात येईल व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे ५० टक्के गुण आणि ५० टक्के अंतर्गत गुणांनुसार तृतीय वर्षात प्रवेश दिला जाईल. तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा लॉकडाऊन उघडल्यानंतर जवळपास दि.८ ते १५ जूनच्या दरम्यान संबंधित क्षेत्रातील परिस्थितीनुसार घेण्यात येईल.

डिग्री म्हणजेच पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येईल. त्याकरिता ५० टक्के गुण चालू सत्राच्या विद्यापीठाने स्वीकृत केलेल्या अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत देण्यात येतील आणि उर्वरीत ५० टक्के गुण हे मागील सत्रांचे घोषित निकालांच्या सरासरीवर (CGPA) आधारीत देण्यात येतील. तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षा (आठव्या सत्रातील) ऑनलाइन आणि ऑफलाइन पध्दतीने १५ जून २०२० पूर्वी घेण्यात येतील आणि या परिक्षेचा निकाल हा १५ जुलै पूर्वी जाहीर करण्यात येईल.

तसेच PG- पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा आणि संशोधन घटक (शोधनिबंध) हे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सल्ल्याने घेतल्या जातील. त्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दत वापरत लॉकडाऊन उघडल्यानंतर पुढील परिस्थिती आणि वेळेनुरूप मूल्यमापित केले जातील. शोधनिबंध सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२० होती अशा विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याकरिता ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कृती आराखड्याबाबत माहिती देतांना कृषी मंत्री भुसे म्हणाले, राज्यातील बहुतेक कृषी महाविद्यालयांची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या विलगीकरणासाठी अधिग्रहीत केलेली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे, त्यांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासह कृषी व संलग्न विषयातील सम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांची सुरक्षा, स्वास्थ्य आणि सुरक्षित अंतर अबाधित राखण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठामधील शैक्षणिक गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी संचालक शिक्षण समन्वय समितीने सत्रनिहाय परीक्षेकरिता कृती आराखडा तयार केला आहे.

Krushi Vidyapeeth Examination For 2020 tentative New Schedule or new timetable details are given by Krushi Mantriji. More details news was published on 12 March in MATA News papers. We are given respective news below. The Candidates looking for Krishi Vidyapeeth Exam Timetable 2020 should read this news carefully. This will be helpful for your studies planning. More updates will be published on MahaBharti.in.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri Timetable 2020, PDKV Akola Exam Timetable 2020, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani Timetable, Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli Timetable Exam Schedule For 2020 New Exam Schedule Details will available.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड