क्रीडा शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त – लवकरच पदभरती अपेक्षित | Krida Shikshak Bharti
Krida Shikshak Bharti
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. उन्हाळी सुट्टीनंतर काही नवीन शाळा सुरू झाल्यामुळे ही गरज आणखी वाढली आहे. तथापि, हे रिक्त पदे वेळेत भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शारीरिक तंदुरुस्तीवर गंभीर परिणाम होत आहेत. पालकांमध्ये संताप वाढत असून, पदांची तातडीने भरती होण्याची मागणी जोर धरत आहे
शासनाने गेल्या दोन वर्षांत विविध विषयांमध्ये २०,००० शिक्षकांच्या पदांची भरती केली आहे, परंतु क्रीडा शिक्षकांची भरती अपेक्षेइतकी झाली नाही, अशी तक्रार क्रीडा शिक्षकांच्या संघटनांकडून केली जात आहे.