Konkan Library Recruitment – There is a significant number of vacant posts in the District Libraries of the Konkan division due to a lack of new recruitment over a long period. A total of 10 posts are currently vacant across the libraries in the division’s six districts. Palghar district has the highest number of vacancies, followed by the districts of Raigad, Sindhudurg, and Ratnagiri, where several positions remain unfilled. This situation is impacting the administrative and technical work of the libraries. Libraries are often referred to as centres of knowledge and culture. The Konkan division has a total of 519 government-recognised libraries in operation Konkan Library Job Vacancies.
District-wise library count in the Konkan Division:
- Ratnagiri: 145 (Highest)
- Sindhudurg: 121
- Thane: 99
- Raigad: 62
- Mumbai Suburban: 34
- Palghar: 34
- Mumbai City: 23
कोकण विभागातील जिल्हा ग्रंथालयांमध्ये दीर्घकाळापासून नवीन भरती न झाल्याने विविध पदे रिक्त आहेत. विभागातील सहा जिल्ह्यांमधील ग्रंथालयांमध्ये मिळून १० पदे रिक्त असून, त्यात सर्वाधिक रिक्त पदे ही पालघर जिल्ह्यात आहेत. त्यानंतर रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही पदे अद्यापही न भरल्याने ग्रंथालयांच्या प्रशासनिक आणि तांत्रिक कामकाजावर परिणाम होत आहे. ग्रंथालये ही ज्ञान आणि संस्कृतीची केंद्रे आहेत, असे म्हटले जाते. कोकण विभागात एकूण ५१९ शासकीय मान्यताप्राप्त ग्रंथालये कार्यरत आहेत. यामध्ये जिल्हानिहाय संख्येनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक १४५ ग्रंथालये, सिंधुदुर्गात १२१, ठाणे जिल्ह्यात ९९, रायगडात ६२, तर मुंबई उपनगरात ३४, पालघरात ३४ आणि मुंबई शहरात २३ ग्रंथालये कार्यरत आहेत. तर कोकण विभागातील ८ जिल्हा ग्रंथालयांमध्ये एकूण ८ ग्रंथालय अधिकारी, ८ सहाय्यक ग्रंथपाल, १४ क्लार्क आणि १२ शिपाई पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी ग्रंथालय अधिकारी २, सहाय्यक ग्रंथपाल ३, क्लार्क ३ आणि शिपाई २ पदे सध्या रिक्त आहेत. अशा प्रकारे एकूण १० पदे रिक्त आहेत.

जिल्हानिहाय पाहता, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक ५ पदांपैकी १ अधिकारी, १ सहाय्यक ग्रंथपाल आणि १ क्लार्क अशी ३ पदे रिक्त आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यात ४ पैकी २ पदे रिक्त, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ पैकी २ पदे तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ पैकी २ पदे रिक्त आहेत. ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये मात्र सर्व पदे भरलेली आहेत. त्यामुळे तेथील कामकाज सुरळीत सुरू आहे.
ग्रंथालयांमध्ये वर्गवारीनुसार अ वर्गातील ७२, ब वर्गातील १६३, क वर्गातील २०२ आणि ड वर्गातील ८२ ग्रंथालये आहेत. तथापि, गेल्या अनेक वर्षांपासून नवीन ग्रंथालयांना शासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया स्थगित आहे. २०१२ पासून आजतागायत एकाही नवीन ग्रंथालयाला शासकीय मान्यता मिळालेली नाही, हे विशेष. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांतील ग्रंथप्रेमी, वाचनालय संघ आणि स्थानिक प्रतिनिधी यांनी रिक्त पदे त्वरीत भरून नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















