अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती सुरु! – त्वरित करा अर्ज – Khed Anganwadi Recruitment 2025
Pune Anganwadi Recruitment 2025
बाळ विकास विभागातर्फे एक आनंदाची बातमी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती प्रक्रिया पुणे जिल्ह्यात सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे(Khed Anganwadi Recruitment 2025). खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय खेड १ आणि खेड २ यांच्या अंतर्गत एकूण ६१ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या २६ आणि मदतनीस पदांच्या ३५ रिक्त जागांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी स्थानिक महिलांना विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी विशाल शिंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर आणि सारिका देशमुख यांनी केले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारी असून, इच्छुक महिलांनी कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. चला तर जाणून घेऊया या भरती बद्दल पुणे माहिती आणि अर्ज प्रकिया कशी आहे..
बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांच्या माहितीनुसार, खेड प्रकल्प क्रमांक १ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या १३ तर मदतनीस पदांच्या २३ जागा रिक्त आहेत. तर प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांच्या माहितीनुसार, खेड प्रकल्प क्रमांक २ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या १३ आणि मदतनीस पदांच्या १२ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
खेड क्रमांक १ अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या जागा पुढील गावांमध्ये उपलब्ध आहेत: ठाकरवाडी (कान्हेवाडी बु.), बारापाटी (कमान), शिरोली, लादवड, ठाकरवाडी (वडगाव पाटोळे), सातकरस्थळ पूर्व, ढोरेभांबुरवाडी, जैदवाडी, गोसासी, सडकवस्ती (कनेरसर), तांबेवाडी (वरुडे), खरपुडी बु., आणि ठाकरवाडी (जऊळुके खु.). तसेच, मदतनीस पदांसाठी गुंडाळवाडी, सहाणेवाडी (कान्हेवाडी बु.), कारकुडी, जावळेवाडी (मंदोशी), नायफड, धारेवाडी (खरोशी), वांजळे, भिवेगाव, एकलहरे, वडगाव पाटोळे, वाकी बु., रानमळा, कडलगवाडी, परसुल, वाजवणे, कुडे खू., घाटवस्ती (सांडभोर वाडी), चांडोली क्र. १, कातकरीवस्ती (चांडोली), ठाकरवाडी (निमगाव), ठाकरवाडी (वाडा), सुरकुंडी आणि वाफगाव क्र. १ या ठिकाणी रिक्त जागा आहेत.
खेड क्रमांक २ अंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या जागा धामणे, कोरेगाव बु., सुपे, सावंजवाडी (आडगाव), कमलजाई (च-होली), बोरदरा, चिंचोशी, ठाकरवाडी (म्हाळुंगे), बापदेवस्ती (कडाचीवाडी), कोळीये, कातकरवाडी (शिवे), आणि आंबेठाण अंगणवाडी नं. १ या गावांमध्ये भरल्या जाणार आहेत. तसेच मदतनीस पदांसाठी आडगाव, भलवडी, विर्हाम, वाघु, तांबडेवाडी (वांद्रा), नाणेकरवाडी, विश्रांतवड (च-होली), खराबवाडी नं. २, विठ्ठलनगर (सांगुर्डी), कोळीये, वाकी तर्फे वाडा आणि आंबेठाण नं. २ या गावांमध्ये रिक्त पदांची भरती होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी काही महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावे. अंगणवाडी सेविका पदासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच, उमेदवारांना दोन अपत्य मर्यादा ही अट लागू असेल. अर्जाची नमुने ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ५ फेब्रुवारीपासून उपलब्ध असून, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह भरलेले अर्ज १८ फेब्रुवारीच्या आत खेड पंचायत समितीच्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात सादर करावेत. या संदर्भात विस्तार अधिकारी अमित लोंढे आणि बापू बागंर यांनी अधिक माहिती दिली आहे.
ही भरती प्रक्रिया खेड तालुक्यातील स्थानिक महिलांसाठी एक उत्तम संधी असून, इच्छुक आणि पात्र महिलांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.