खामगाव आयटीआयमध्ये महिला रोजगार मेळावा आयोजित, अर्ज करा.! – Khamgaon ITI Rojgar melava
Khamgaon ITI Rojgar melava
खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 28 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत मॉडेल करियर सेंटर बुलडाणा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव यांच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन खामगाव आयटीआयमध्ये करण्यात आले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर महिला रोजगार मेळाव्यात हिंदुस्थान युनीलीव्हर लिमिटेड, खामगाव या उद्योजकांनी त्यांच्याकडील आयटीआय इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रुमेंटेशन, फिटर या पदांसाठी फक्त महिलांसाठी 15पेक्षा अधिक पदे अधिसुचित केली आहेत. तसेच एलआयसी इंडियाच्या विमा अभिकर्ता पदासाठी देखील 20 पदे अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे गरजू व रोजगार इच्छुक महिला उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी सुद्धा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली असलेल्या अथवा नसलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर महिला उमेदवारांनी दि. 28 जून 2024 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जलंब रोड, खामगाव, येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे आणि रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन घ्यावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पात्र, गरजू व नौकरी इच्छुक महिला उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीताही अर्ज करु शकतात. तरी इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहून नाव नोंदणी करावी, उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचा 07262-242342 दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.