अभियांत्रिकी महाविद्यालयात रोजगार मेळावा, ८ हजार पदांसाठी भरती; तब्बल १२५ कंपन्यांचा सहभाग

karad rojgar melava

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड व केंद्रीय संस्था शिक्षुता प्रशिक्षण मंडळ संयुक्त विद्यमाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बीई, बीटेक, डिप्लोमा, बी फार्मसी, आयटीआय, बीएसस्सी, बी.ए., बी. कॉम., बी.बी.ए. आणि इतर विविध अभ्यासक्रमांच्या टेक्निकल, नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी १२५ पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये ८००० पेक्षा जास्त देशात व परदेशात रोजगार संधी उपलब्ध झाल्या असल्याची माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता प्रा. उमा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक प्राध्यापिका पौर्णिमा कावलकर, प्रा. सौरभ यादव, कार्यशाळा अधिक्षक राजेश गायकवाड यांची उपस्थिती होती. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सामाजिक दायित्वाची भावना ठेवून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे सह देशातील टॉपच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांमध्ये सध्या सुमारे ८ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या रोजगार मेळाव्यातून रोजगाराची संधी युवकांना देण्यात येणार आहे.

karad rojgar melava

 

मेळाव्यात बी.ई., बी.टेक., डिप्लोमा, बी. फार्मसी, आयटीआय, बी.एस्सी, बी. ए., बी. कॉम., बी. बी.ए. आणि इतर विविध अभ्यासक्रमांच्या टेक्निकल, नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी देशात, परदेशात रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ लाख रोजगार निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रेरणेने आणि स्किल इंडिया योजनेच्या अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या या रोजगार मेळाव्याचे आयोजन मुख्यतः राज्यातील शेती, बांधकाम, वाहतूक पर्यटन या व्यवसायातील वाढती उलाढाल व वाढती औद्योगिक गुंतवणूक यामधून विविध क्षेत्रातील नामंकित कंपन्यांमधील, सेवा क्षेत्रातील निर्माण झालेल्या रोजगार संधीचा लाभ अधिकाधिक राज्यातील ग्रामीण शहरी, निम शहरी सर्व पात्र युवक युवती मिळावा आणि त्यांना त्यांच्या करिअरची सुरुवात नामांकित कंपनी मधून सुरु करण्याची संधी मिळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विविध योजना द्वारे सर्व क्षेत्रात रोजगार निर्माण होत आहेत याचा फायदा राज्यातील युवक युवती यांना होईल व या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मेळाव्यासाठी नोंदणीची आवश्यकता रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यादिवशीही नोंदणी होणार आहे. याठिकाणी असणाऱ्या विविध कंपन्यांत पात्रतेनुसार नोकरीची संधी ऑन दि स्पॉट मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे मेळाव्यासाठी येताना सर्व कागदपत्रांसहित उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व युवकांना या मेळाव्यात संधी दिली जाणार असून युवकांना त्यांच्या इच्छेनुसार व पात्रतेनुसार मेळाव्यादिवशी कंपनी निवडण्याचा अधिकारी असणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड