दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी पूर्ण माहिती – Jobs in Russia for India

Jobs in Russia for India –  Friends, working in a country outside of India is a dream for many young people. Those seeking jobs in the USA, Canada, Dubai, and European countries are at the forefront of this trend. However, Indian workers who previously looked to these countries are now turning to the Russian job (Jobs in Russia for India) market with great hope. Due to the prolonged war with Ukraine and the declining young population in the country, Russia is currently facing a significant labor shortage. As a result, Russia needs Indian workers in many sectors, from construction to oil and gas refineries, and the number of Indians going to Russia has increased by 60 percent in the last four years. So, let’s find out what job opportunities are currently available in Russia!

 

मित्रांनो, भारताच्या बाहेर अन्य देशात नोकरी करणं हे अनेक उंडवरांचे स्वप्न असत. यात अमेरिका, कॅनडा, दुबई आणि युरोपियन देशात नोकरी शोधणारे आघाडीवर असतात. मात्र आतापर्यंत अशा देशांकडे वळणारे भारतीय कामगार आता रशियाच्या बाजारपेठेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. युक्रेनसोबत सुरू असलेले प्रदीर्घ युद्ध आणि देशातील घटत्या तरुण लोकसंख्येमुळे रशियामध्ये सध्या कामगारांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी, कन्स्ट्रक्शनपासून ते तेल-गॅस रिफायनरीपर्यंत अनेक क्षेत्रांत रशियाला ‘भारतीय हातांची’ गरज भासत असून, गेल्या चार वर्षांत रशियात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चला तर जाणून घेऊया रशिया मधील नोकरीच्या कोणत्या संधी सध्या उपलब्ध आहेत! 

Jobs in Russia for India

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

पगाराचे आकर्षक पॅकेज आणि सुविधा

सध्या रशिया मध्ये एका सामान्य मजुराचा सुरुवातीचा पगार किमान ५०,००० रुपये प्रति महिना आहे. ओव्हरटाइम आणि अनुभवासह हे उत्पन्न १.५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. आयटी किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञांना १.८ लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळत आहे. खाणी, रिफायनरी आणि ऑईलफिल्ड्समध्ये काम करणाऱ्यांना अनेक कंपन्या राहणे आणि जेवण मोफत देतात, ज्यामुळे मोठी बचत शक्य आहे. तसेच भारताच्या तुलनेत हि रक्कम बरीच चांगली आहे.

 

कोणत्या कामांना आहे सर्वाधिक मागणी?
रशियामध्ये सध्या ‘ब्लू-कॉलर’ जॉब्ससाठी मोठी भरती सुरू आहे. प्रामुख्याने वेल्डर, सुतार, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर आणि फॅक्टरी ऑपरेटर या कामांसाठी भारतीय कामगारांना अधिक पसंती दिली जात आहे. विशेषतः पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधून लोक रशियाकडे वळत आहेत.

रशियाला भारतीयांची गरज का?
रशियाची लोकसंख्या वेगाने वृद्ध होत असून काम करण्यासाठी तरुण वर्गाची कमतरता आहे. तर दुसरीकडे युक्रेन युद्धासाठी स्थानिक तरुणांची मोठ्या प्रमाणावर लष्करामध्ये भरती करण्यात आली आहे, त्यामुळे नागरी कामांसाठी मनुष्यबळ उरलेले नाही. रशियन श्रम मंत्रालयानुसार, या दशकाच्या अखेरपर्यंत देशाला सुमारे १.१ कोटी अतिरिक्त कामगारांची गरज भासणार आहे. २०२४ मध्ये रशियाने ७२,००० भारतीयांना वर्क परमिट दिले असून, हा एकूण विदेशी कोट्याचा एक तृतीयांश हिस्सा आहे.

 

रशियामध्ये नोकरी मिळवण्यासाठी अधिकृत मार्गाचाच अवलंब करणे सुरक्षित आहे.

मित्रांनो, अशा नोकरी साठी अनेकवेळा फसवणूक सुद्धा होऊ शकते, म्हणून भारत सरकारने परवाना दिलेल्या भर्ती एजन्सींशी संपर्क साधा आणि सर्व माहिती खात्रीपूर्वक तपासा.

  • नोंदणीकृत एजन्सी : भारत सरकारने परवाना दिलेल्या भर्ती एजन्सींशी संपर्क साधा. (उदा. Layboard, Naukri किंवा BCM Group सारखी दालने).
  • इनव्हिटेशन लेटर : रशियन गृह मंत्रालयाकडून जारी केलेले निमंत्रण पत्र सर्वात महत्त्वाचे आहे. त्याशिवाय वर्क व्हिसा मिळत नाही.
  • आवश्यक कागदपत्रे : पासपोर्ट, मेडिकल सर्टिफिकेट (HIV चाचणीसह), पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आणि शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • व्हिसा फी : २,००० ते १०,००० रुपयांच्या दरम्यान असून व्हिसा मिळण्यास ७ ते २० दिवस लागतात.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड