जेएनयू पीएचडी विद्यार्थ्यांसाठी टप्प्याटप्प्याने उघडणार
JNU to Reopen from Nivember 2 in Phased Manner for Ph.d Students
JNU Reopen : JNU to Reopen from Nivember 2 in Phased Manner for Ph.d Students : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी पीएचडी विद्यार्थ्यांसाठी टप्प्याटप्प्याने उघडणार आहे.
JNU Reopen: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) बुधवारी जाहीर केले की सध्या सुरू असलेल्या करोना व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आता कॉलेज कॅम्पस टप्प्याटप्प्याने उघडला जाईल. या निर्णयाबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे.
परिपत्रकानुसार, सायन्स स्कूल आणि विशेष केंद्रांवर प्रयोगशाळेच्या कामासाठी आवश्यकता असणारे 9 बी विद्यार्थी आणि प्रकल्प कर्मचारी तसेच मागील वर्षीचे पीएचडी रिसर्चर स्कॉलर (डे-स्कॉलर) यांच्यासाठी २ नोव्हेंबर, २०२० रोजी कॅम्पस उघडले जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पीएचडी रिसर्च स्कॉलरलाठी १६ नोव्हेंबरपासून दुसरा टप्पा सुरू होईल. वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी ३१ डिसेंबर २०२० किंवा ३० जून २०२१ पूर्वी पीएचडी प्रबंध सादर करू शकतात.
परिपत्रकातील महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे –
- – पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी त्यांच्या पर्यवेक्षकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असेल.
- – दिल्लीबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी ७ दिवस स्वत: ला क्वारंटाइन ठेवणे आवश्यक आहे.
- – जे विद्यार्थी कॅम्पसमध्ये येत आहेत त्यांना करोनाव्हायरस संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
- विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकत्र येऊ दिले जाणार नाही. बैठक केवळ ऑनलाइन मोडमध्ये असेल.
- – कॅम्पसमध्ये कॅन्टीन व ढाबे बंद राहतील.
- – सेंट्रल लायब्ररी बंद राहील.
-
– प्रयोगशाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल.
सोर्स : म. टा.