JEE Advanced 2021 संबंधी परिपत्रक जारी; परीक्षा स्थगित!!

JEE Advanced 2021

JEE Advanced 2021 Postponed

JEE Advanced 2021 : The JEE Advanced Exam has been postponed till further notice, the revised date of the exam will be announced in due course. Students should visit the official website regularly for more information about the exam.

JEE Advanced संबंधी परिपत्रक जारी; परीक्षा स्थगित!! – जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा तूर्त पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, परीक्षेची सुधारित तारखेची घोषणा यथावकाश जाहीर केली जाईल. परीक्षेसंबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट वर नियमित भेट द्यावी.

करोना व्हायरस (COVID19) ची स्थिति लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. JEE Advanced 2021 परीक्षा ३ जुलै २०२१ रोजी आयोजित होणार होती.

JEE Advanced 2021 New Exam Date?

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा तूर्त पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, परीक्षेची सुधारित तारखेची घोषणा यथावकाश जाहीर केली जाईल. उमेदवार जेईई अॅडव्हान्स्डच्या अधिकृत संकेतस्थळावर jeeadv.ac.in वर परिपत्रक पाहता येईल. नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक पुढे देण्यात आली आहे.

JEE Advanced Exam Patern

जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेत पेपर I आणि पेपर II असे दोन पेपर असतात. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पेपर होईल. दुसरी शिफ्ट दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल.

परिपत्रक – http://jeeadv.ac.in/ 


IIT JEE Advanced

JEE Advanced 2021 : IIT JEE Advanced: आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. IIT मधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा घेतली जाते. परीक्षेच्या सिलॅबससह पेपर १ आणि पेपर २ ची ऑनलाइन मॉक टेस्टही अपलोड करण्यात आली आहे.

मॉक टेस्टचा सराव करण्यासाठी आणि संपूर्ण सिलॅबस डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. यंदा आयआयटी खरगपूर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन करणार आहे. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in वर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आयआयटी खरगपूरद्वारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचे आयोजन शनिवार ३ जुलै २०२१ रोजी करण्यात येणार आहे. पेपर -१ ची परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होईल. पेपर २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल.

जेईई अॅडव्हान्स्ड सिलॅबस २०२१

फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससह आर्किटेक्चर एप्टीट्यूड टेस्ट (AAT) चा अभ्यासक्रमदेखील जारी करण्यात आला आहे. याच अभ्यासक्रमाच्या आधारे जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ मध्ये प्रश्न विचारण्यात येतील. आपण पुढे दिलेल्या लिंक्स क्लिक करून सिलॅबस डाऊनलोड करू शकता –

जेईई अॅडव्हान्स्ड मॉक टेस्ट २०२१ 

आयआयटी खरगपूरने जेईई अॅडव्हान्स्ड २०२१ च्या तयारीसाठी ऑनलाइन सराव करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेपर १ आणि पेपर २ दोन्हीसाठी ऑनलाइन मॉक टेस्ट जारी करण्यात आली आहे. पुढे दिलेल्या लिंक क्लिक करून तुम्ही सराव करू शकता.


JEE Advanced 2021 : jee advanced 2021 criteria of minimum 75% marks waived off in view of covid-19 – देशातील लाखो विद्यार्थी ज्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख आणि इंजिनीअरिंग प्रवेशांच्या निकषाची आतुरतेने वाट पाहत होते, त्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी केली. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा (JEE Advanced Date) ३ जुलै २०२१ रोजी होणार आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IIT), एनआयटी (NIT), ट्रिपल आयटी (IIIT) जीएफटीआय (GFTI) मधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट अॅडव्हान्स्ड २०२१ (JEE Advanced) परीक्षा घेतली जाते.

आयआयटी खरगपूर (IIT Kharagpur) ही परीक्षा आयोजित करणार आहे. विशेष म्हणजे, बारावी परीक्षेत ७५ टक्के गुणांच्या अनिवार्यतेची अट यंदा रद्द करण्यात आली आहे.

जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २०२१ ची वेबसाइट लवकरच लाँच केली जाणार आहे. आयआयटी खरगपूरकडे यंदा या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आहे. जे विद्यार्थी जेईईची तयारी करत आहेत, त्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा पोखरियाल यांनी केली आहे.

आतापर्यंत देशातील आयआयटींमध्ये अभियांत्रिकी पदवी परीक्षांच्या प्रवेशांसाठी जेईई अॅडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षा उत्तीर्ण होण्यासह बारावीतही किमान ७५ टक्के गुण असणे अनिवार्य होते. यंदा कोविड-१९ महामारी स्थितीमुळे विलंबाने सुरू झालेले शैक्षणिक वर्ष, विलंबाने झालेल्या परीक्षा, विद्यार्थ्यांवरील ताण या सर्व बाबी लक्षात घेऊन ही बारावीतील ७५ टक्के गुणांच्या अनिवार्यतेची अट रद्द करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त जेईई मेन (JEE Main) परीक्षेच्या रचनेत काय बदल केले आहेत, त्याची घोषणा पोखरियाल यांनी यापू्र्वीच केली आहे. जेईई मेन परीक्षा आता वर्षातून चार वेळा होणार आहे. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार यापैकी एक किंवा सर्व परीक्षा देऊ शकतात. सर्वाधिक गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी टॉप २.५० लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड (JEE Advanced) परीक्षेसाठी पात्र ठरतात.


जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख, IIT प्रवेश निकषांची घोषणा ‘या’ दिवशी 

JEE Advanced 2021 : education minister ramesh pokhriyal to announce jee advanced 2021 dates, iit eligibility criteria on 7th January – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक येत्या ७ जानेवारी रोजी एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत. देशभरातील आयआयटींमधील (IIT) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Advanced 2021) अॅडव्हान्स्डच्या तारखेची घोषणा शिक्षणमंत्री करणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

आयआयटी प्रवेशांसाठी आवश्यक पात्रता यंदा काय असणार आहे, याबाबतची घोषणा देखील पोखरियाल यावेळी करणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनीच स्वत: ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. ७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता शिक्षणमंत्री घोषणा करणार आहेत.

दरम्यान, जेईई मेन (JEE Main 2021) च्या तारखेची घोषणा यापूर्वीच पोखरियाल यांनी केली आहे. जेईई मेन परीक्षा यंदा चार वेळा होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान परीक्षा होईल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत १६ जानेवारी २०२१ आहे.

पोखरियाल यांनी ट्विट केले आहे की, ‘प्रिय विद्यार्थ्यांनो, आयआयटींमधील प्रवेशासाठी पात्रतेचे निकष आणि जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेच्या तारखेची घोषणा मी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता करणार आहे.’ ७ जानेवारी रोजी #EducationMinisterGoesLive कार्यक्रम होणार आहे.

थेट अॅडव्हान्स्डला बसण्याची मुभा

कोविड -१९ महामारी काळात ज्या विद्यार्थ्यांना जेईई मेन २०२० परीक्षा पात्र होऊनही जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देता आली नव्हती, त्यांच्यासाठी यंदा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला थेट बसण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना यंदा पुन्हा जेईई मेन परीक्षा द्यावी लागणार नाही.

जेईई मेन २०२१ मध्ये अनेक बदल

बी.ई. आणि बी.टेक्. साठी होणारी जेईई मेन परीक्षा यंदा चार वेळा होणार आहे. म्हणजे एकदा परीक्षा हुकली तरी विद्यार्थ्यांनी ती देण्यासाठी अन्य तीन संधी मिळणार आहेत. विद्यार्थी एकापेक्षा अधिक वेळा ही परीक्षा देऊ शकतात. त्यांचा बेस्ट स्कोर ग्राह्य धरला जाणार आहे. दुसरं म्हणजे ही परीक्षा तब्बल ११ प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे.

पेपर पॅटर्नमध्येही बदल

यंदा करोनामुळे अनेक राज्यांनी दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली आहे. हे लक्षात घेऊन जेईई मेन परीक्षेचा पॅटर्न बदलण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एकूण ९० प्रश्नांपैकी कोणतेही ७५ प्रश्न सोडवायचे आहेत. या ९० प्रश्नांमध्ये सर्व सिलॅबस कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड