जव्हार तालुक्यात आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज, रुग्णांचे हाल! – Jawhar Nagar Parishad Bharti 2024
Jawhar Nagar Parishad Bharti 2024
Jawhar Nagar Parishad Bharti 2024 Jobs Details
जव्हार तालुका हा ग्रामीण आणि दुर्गम भाग आहे. येथे आरोग्य सेवा हा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. जव्हार शहरातील १०० खाटांचे पतंग शाह उपजिल्हा रुग्णालयावर मोखाडा, विक्रमगड, वाडा हे तालुके; तसेच डहाणू तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. शिवाय, याच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची वर्णी पालघर येथील जिल्हा शल्यचिकित्सक पदी लागल्याने येथे पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकसह २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर रुग्ण सेवा देताना अतिरिक्त कामाचा ताण येऊन आरोग्य सेवेवरही परिणाम होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज चालवताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच या रुग्णालयात प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, सर्जन, फिजीशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ; तसेच भूलतज्ज्ञ आणि दंतरोग तज्ज्ञ ही पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवा देताना मर्यादा येत आहेत. परिणामी, रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक, सेलवास, ठाणे येथे पाठवले जाते. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना सेवा देण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी असणे गरजेचे असताना वर्षाहून अधिक काळापासून पुरेसे कर्मचारी उपलब्ध होऊ शकलेले नाही. सध्या उपजिल्हा रुग्णालयाकडे १०७ मंजूर पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. त्याचा रुणसेवेवरही परिणाम होऊ लागला आहे.
दर महिन्याला अहवाल
अलीकडच्या काही वर्षांत आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्षच केले आहे. त्याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसत आहे. डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अहवाल दर महिन्याला उपजिल्हा रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवला जातो. मध्यंतरी काही पदे भरली आहेत. गेल्या काही वर्षांत रिक्त पदे पूर्णपणे भरलेलीच नाहीत. त्याचबरोबर वयोमानानुसार कर्मचारीही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन पदे तातडीने भरली जात नाहीत. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेची घडी विस्कटण्याच्या मार्गावर आली आहे.
अनेक वर्षे पदे रिक्तच
सरकारकडून आरोग्य सेवेतील पदांची भरती केली जात नाही. मध्यंतरी भरती प्रक्रिया पार पडली; मात्र त्यात पुरेसी पदे भरली नाहीत. अनेक वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने यापूर्वी कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर व काही कर्मचारी सेवेसाठी घेतले होते. मात्र, तरी अतिरिक्त कामाचा ताण त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याचा विचार करून पदे भरती करणे गरजेचे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Jawhar Nagar Parishad Bharti 2020 : Municipal Council Palghar Jawhar Nagar Parishad Palghar Jilha is going to conduct walk-in interview for the interested and eligible candidates to the “Medical Officer, Arogya Sevika, Laboratory Technician, Peon Posts” posts under Jawhar Nagar Parishad Recruitment 2020. Application is inviting filling up the 04 vacancies available to fill. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address. Walk-in interview will be conducted on 29th September 2020. More details are as follows:-
Jawhar Nagar Parishad Bharti 2020 : जव्हार नगर परिषद, जि. पालघर येथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई
- पद संख्या – 4 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पालघर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जव्हार नगर परिषद कार्यालय
- मुलाखतीची तारीख – 29 सप्टेंबर 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Jawhar Nagar Parishad Bharti | |
PDF जाहिरात : https://bit.ly/363Fh84 | |
अधिकृत वेबसाईट : https://palghar.gov.in/ |
Jawhar Nagar Parishad Palghar Bharti 2020 Details |
|
Name of Department | Jawhar Nagar Parishad |
Recruitment Details | Jawhar Nagar Parishad Recruitment 2020 |
Name of Posts | Medical Officer, Arogya Sevika, Laboratory Technician, Peon |
Total Posts | 04 Posts |
Selection Process | Walk-in Interview |
Address | जव्हार नगर परिषद कार्यालय |
Official Website | palghar.gov.in |
Eligibility Criteria For Jawhar Nagar Parishad Bharti |
|
Medical Officer | MBBS/ BAMS |
Arogya Sevika | ANM/ GNM |
Laboratory Technician | B.Sc DMLT |
Peon | 12th Pass |
Vacancy Details |
|
Medical Officer | 01 Post |
Arogya Sevika | 01 Post |
Laboratory Technician | 01 Post |
Peon | 01 Post |
All Important Dates |
|
Walk-in Interview Date | 29th September 2020 |
Important Links For Jawhar Nagar Parishad Palghar Bharti
|
|
Full Advertisement |
READ PDF |
Official Site |
OFFICIAL WEBSITE |
Table of Contents