विविध भारतीय कंपन्या करणार नोकरभरती- नोकरीच्या अनेक संधी!
IT Jobs 2023
IT Company Jobs Opportunity – IT Jobs 2023
IT Jobs 2023 : Following the second wave of corona in the country, major IT companies are now considering hiring new employees. TCS, Infosys, Wipro, and others will be hiring more than one lakh employees this financial year. Further details are as follows:-
जगभरात नोकऱ्यांमधील भरतीबाबत नकारात्मक वातावरण आहे. पण भारतीय कंपन्या नवीन भरती आणि बदलीबाबत खूप आशावादी आहेत. कोलकत्ता एचआर सोल्युशन्स कंपनी जिनियस कन्सल्टंटने सर्वेक्षण केलेल्या २,१०० कंपन्यांमधील तीन-चतुर्थांश किंवा ७७% पेक्षा जास्त एचआर अधिकारी म्हणाले की, ते २०२३ २४ या कालावधीत कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्याची योजना आखत आहेत.दक्षिण भारत आणि पश्चिम भारतातील बहुतेक कंपन्या या आर्थिक वर्षात नोकरी देऊ इच्छित आहेत. अशा कंपन्यांची संख्या ३३.३० टक्के होती. यंदा सरासरी अनुभव असलेल्या भरतीला कंपन्या प्राधान्य देत आहेत. ३६.०६% कंपन्यांनी सांगितले की, ते ४ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना कामावर ठेवतील. केवळ ९% कंपन्यांनी १३ वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या लोकांना कामावर घेण्याचे सांगितले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिनियस कन्सल्टंटने यावर्षी १२ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये हे सर्वेक्षण केले होते. यामध्ये बँकिंग फायनान्स, बांधकाम आणि अभियांत्रिकी, एज्युटेक, एफएमसीजी, हॉस्पिटॅलिटी, एचआर सोल्युशन्स, आयटी, आयटीईएस, बीपीओ, लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, मीडिया, तेल आणि गॅस, फार्मा आणि मेडिकल, पॉवर आणि एनर्जी, रिअल इस्टेट, रिटेल, टेलिकॉम, ऑटो यांचा समावेश आहे आणि सहायक क्षेत्रांचा समावेश आहे.
दक्षिण, पश्चिम भारतात सर्वाधिक नोकऱ्या
- ७७% कंपन्या या आर्थिक वर्षात नवीन भरती आणि बदलीची योजना आखत आहेत.
- नोकरीस इच्छुक असलेल्या३३% कंपन्या देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील आहेत.
- ३६% कंपन्या ४ ते ७ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना कामावर ठेवण्यास प्राधान्य.
- ६४% कंपन्यां कामावर घेण्यापूर्वी पार्श्वभूमी तपासणार
जागतिक मंदीच्या सावटामुळे सध्या जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यानी नोकरकपात सुरु केली आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांमध्ये चिंतेच वातावारण आहे. कारण अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पुर्ण करुन नोकरीच्या शोधात असतानाच जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात असल्यामुळे आपणाला नोकरी कशी मिळणार? असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. पण सध्या या तरुणांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ऐन नोकरकपातीच्या काळात काही कंपन्यांकडून नोकरभरती केली जात आहे. यामध्ये IT कंपन्या आघाडीवर आहेत. तर कोणत्या कंपन्यांमध्ये नोकरभरती केली जाणार आहे आणि किती जागांसाठी ही भरती असेल याबाबतची माहीती जाणून घेऊया.
नोकरी पोर्टल (Naukri.com) च्या JobSpeak च्या अहवालानुसार, भारतातील नोकरभरतीच्या परिस्थितीत जानेवारी २०२३ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२३ मध्ये वाढ दिसून आली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांत रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये घसरण झाल्यानंतर आयटी क्षेत्राने सकारात्मक पुनरागमनाचे संकेत दिले असून ही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे.
वॉटरहाऊस कूपर्स –
भारतातील आपल्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी, अकाऊंटिंग आणि कन्सल्टन्सी फर्म प्राइसवॉटरहाऊस कूपर्स इंडियाने (Price Waterhouse Coopers) पुढील ५ वर्षांमध्ये ३० हजार लोकांना नोकरी देण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील कामगारांची संख्या ८० हजारांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
इन्फोसिस (Infosys) –
इन्फोसिसमध्ये ४,२६३ जागांवर भरती केली जाणार असल्याची माहिती लिंक्डइनने दिली आहे. त्यानुसार या कंपनीत इंजिनियर, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सल्लागार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे.
विप्रो (Wipro) –
विप्रोकडे भारतात ३,२९२ कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याची माहीती LinkedIn ने दिली आहे. त्यानुसार, कंटेंट रिव्यूअस ते मार्केट लीड यासारख्या विवध पदांवर भरती करण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहक सेवा, ऑपरेशन्स, इंजिनियरींग, IT आणि माहिती सुरक्षा, अकाऊंट अँड फायनान्स विभागांमध्येही भरती करण्यात येणार आहे.
TCS –
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनी काही हजार लोकांना नोकरी देणार असल्याची माहिती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड यांनी दिली आहे
महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांचा भारतीय आयटी क्षेत्रावर काही परिणाम होत नसल्याचं दिसत आहे. भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी भरती सुरू केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीनं तंत्रज्ञांची नियुक्ती सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता डेलॉइट इंडियानं कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनी सध्या जावा डेव्हलपर्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअर्सच्या शोधात आहे. ‘टेकगिग’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
डेलॉइट इंडियानं आपल्या दिल्ली येथील कार्यालयात नवीन जावा डेव्हलपर्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअर्सना संधी देण्याचा निर्णय घेताल आहे. जावा डेव्हलपर पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील:
1. डब्ल्यूएचओ गाइडलाइन्सनुसार सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून दिल्लीमध्ये काम करण्यासाठी चार ते सहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
2. एंटरप्राईज लेव्हलवर असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपचा वापर देशातील एक लाख जणांनी केला आहे. त्यामुळे कंपनी तांत्रिकदृष्ट्या मजबूत व्यक्तींच्या शोधत आहे, ज्या या वेब अॅप्लिकेशन्सच्या देखभाल आणि वाढीसाठी डिलिव्हरेबल्सची जबाबदारी घेऊ शकतात.
3. जावा-आधारित वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्समध्ये किमान तीन वर्षे कामाच अनुभव गरजेचा आहे.
4. जावा 1.8, स्प्रिंग-बूट, अँग्युलर जेएस या तंत्रज्ञानाचा अनुभव आवश्यक.
5. PostgreSQL किंवा इतर RDBMS डेटाबेसमधील अनुभव आवश्यक.
6. मागणी आणि प्राधान्याच्या आधारावर टीमसोबत काम करण्याची क्षमता आवश्यक.
7. गरजा आणि फील्ड इश्यूज समजून घेण्यासाठी, कामाच्या प्रगतीबाबत संवाद साधण्यासाठी चांगली संभाषण कौशल्ये आवश्यक.
डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअरच्या पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील:
1. अहवालांसाठी आवश्यक स्पष्टीकरण देण्याची क्षमता पाहिजे.
2. टेक्निकल सोल्युशन डिझाइनच्या दृष्टिने सर्व गरजा एकत्रित करून ती सोल्युशन्स तयार करण्याचं अंदाजपत्रक तयार करणं.
3. टेक्निकल डिझाइनच्या दृष्टिकोनातून फंक्शनल स्पेक्सच्या डेव्हलपमेंटमध्ये योगदान देणं.
4. टेक्निकल सोल्युशन डिझाइनवर आधारित रिपोर्ट्स आणि व्हिज्युअलायझेशन्स विकसित करणं.
5. रिक्वायरमेंट डेफिनेशन्स किंवा तांत्रिक डिझाइन प्रश्नांच्या सपोर्टसाठी प्रोटोटाइपिंग आणि पीओसी करणं.
6. युनिट चाचण्या, डिफेक्ट रिझोल्युशन आणि हायपर केअर कार्यान्वित करणं.
IT jobs are available? Because I am IT Engineer i have no job. Can help me to job
Notify me for IT jobs
Exam syllabus ky aahe.exam kadhi kuthe asti
Chagla job
Ya sathi job sathi apply kuthe karaych ahe