Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आनंदाची बातमी! नव्या वर्षात बंपर भरती करण्यासाठी देशातील कंपन्या सज्ज! । IT Company Mega Recruitment 2023

IT Company Mega Recruitment 2023

IT Company Mega Recruitment 2023

आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. या क्षेत्रात येणाऱ्या काळात प्रत्यक्ष ५० हजार तर अप्रत्यक्ष १.५० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रीतील दिग्गज डेल, एचपी, लिनोवो, फॉक्सकॉन सारख्या २७ कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेंतर्गत मंजुरी मिळाली मिळाली आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. पीएलआय योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या ९५ टक्के कंपन्या पहिल्या दिवसांपासून उत्पादन सुरू करणार आहेत. जवळपास २३ कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. तर उर्वरित चार कंपन्या येत्या तीन महिन्यांमध्ये या योजनेंतर्गत उत्पादन सुरू करण्याची शक्यता आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील २७ कंपन्या आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यातून ५० हजार रोजगार निर्माण होतील. तर अप्रत्यक्षपणे १.५० लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत. आयटी हार्डवेअर योजनेंतर्गत ज्या कंपन्यांना मंजुरी मिळाली आहे, त्यात डेल, फॉक्सकॉन, लिनोवो, फ्लेक्सट्रॉनिक्स, पेजेट, सोजो, व्हीव्हीडीएन, सिरमा, भगवती, निओलिंक या कंपन्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, देशात आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने २.० प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना सुरू केली आहे. आयटी हार्डवेअरच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या नवीन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यासाठी करकार १७ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

 


प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनीपैकी एक महत्त्वाची कंपनी असणार्‍या स्विगीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Swiggy ने खाते व्यवस्थापक (Account Manager) पदासाठी रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. सदर भरती ही कंपनीच्या रिटेल विभागामध्ये असून, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अन्न आणि पेय (Food and Beverages) उद्योगात रस असणे आवश्यक आहे.

या असणार मूळ जबाबदार्‍या :

  • नियुक्त केलेल्या प्रदेशासाठी रेस्टॉरंट ऑनबोर्डिंग आणि टीम वाढवण्याला प्राधान्य देणे.
  • याव्यतिरिक्त, व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी आणि परस्पर वाढण्यासाठी रेस्टॉरंट भागीदारांसाठी सल्लागार म्हणून काम करणे.
  • रेस्टॉरंट खात्यांचा (Swiggy Restaurant Accounts) चा पोर्टफोलिओ तयार आणि आवश्यकतेनुसार अपडेट करणे.
  • विक्री लक्ष्ये आणि कामगिरीवर आधारित लक्ष्ये वाढवणे.
  • सर्वोत्कृष्ट स्थानिक आणि राष्ट्रीय रेस्टॉरंटसाठी काम करण्याच्या इच्छेसह उमेदवारांना अन्न आणि पेय उद्योगात रस असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार हा स्थानिक बाजार तज्ञ असावा.
  • रेस्टॉरंट फीडबॅक गोळा करणे, स्पर्धकांच्या क्रियाकलापांचे निरीक्षण करणे आणि सुधारणेसाठी शिफारसी देणे यासाठी ते जबाबदार असेल.
  • कोल्ड कॉल आणि वॉक-इन आयोजित करणे, वैयक्तिक मीटिंग शेड्यूल करणे आणि रेस्टॉरंट्सना डायनआउट उत्पादन पोर्टफोलिओ विकणे.

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.

कामाचा अनुभव :
सल्लागार, ई-कॉमर्स किंवा स्टार्टअपमध्ये १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात.
शिवाय, फ्रेशर्स (कोणताही) अनुभव नसलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

मिळणार भरपूर पगार :
स्विगीमधील खाते व्यवस्थापकाच्या पदावर निवड होणार्‍या उमेदवारला वर्षाला ३ लाख ते १०.५ लाख रुपयांच्या दरम्यान पगार मिळू शकतो.

आवश्यक कौशल्ये:

उमेदवार कामाच्या वेळेच्या बाबतीत लवचिक असावा.
उमेदवार स्वतःवर आणि कामावर आत्मविश्वासपूर्ण असावा.
उमेदवार हा ‘आउट-ऑफ-द-बॉक्स थिंकर’ असावा आणि त्याने नेहमी कोणत्याही परिस्थितीत काम करण्यास तयार असणे आवश्यक आहे.

 

अर्ज करा

 


IT Company Mega Recruitment 2023 : Companies such as Google and HCL Tech have announced the recruitment of employees. Google company wants employees to work from home, HCL Tech company wants employees for Pune office. Let’s know more about IT Company Mega Recruitment 2023 at below :

 

आयटी कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. यात फ्रेशर्संना संधी देण्यात येणार आहे. TeamLease EdTech प्लॅटफॉर्मच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील आघाडीच्या भारतीय IT कंपन्या जुलै-डिसेंबर २०२३ दरम्यान देशभरात IT आणि नॉन-IT दोन्ही क्षेत्रांमध्ये सुमारे ५०,००० फ्रेशर्सना नियुक्ती देण्याची तयारी करत आहेत. एड-टेक प्लॅटफॉर्मने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, IT उद्योगात डिजिटल परिवर्तन उपक्रमांचा जलद अवलंब केल्यामुळे, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा आणि इतर प्रगत तंत्रज्ञानामध्ये नवीन व्यवसाय संधी निर्माण होत आहेत.

 

टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शंतनू रूज यांनी दिलेल्या माहितीनुसार, एआय, ब्लॉकचेन, क्लाउड कंप्युटिंग इत्यादीसारख्या नोकऱ्या लवकरच त्यांचा ‘विदेशी’ टॅग गमावणार आहेत आणि कॅल्क्युलेटर किंवा लॅपटॉप सारखी सामान्य साधने बनणार आहेत. आज कोणत्याही कंपनीने त्यांच्या एकूण व्यवसाय धोरणात AI चा समावेश न करणे अत्यंत बेजबाबदारपणाचे ठरेल.

 

संपूर्ण भारतातील १८ उद्योगांमधील ७३७ लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर, टीमलीज अहवालात नमूद केले आहे की, जुलै-डिसेंबर २०२३ दरम्यान, नवीन भरती करण्याचा कंपन्यांचा हेतू ७३ टक्के आहे, यामध्ये स्टार्टअप्सचा समावेश आहे. फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा हेतू ६५ टक्के आहे. यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत फ्रशर्संची मागणी ६२ टक्क्यांच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढली आहे. जुलै-डिसेंबर २०२३ मध्ये फ्रेशर्सची नियुक्ती करू इच्छिणारे शीर्ष ३ उद्योग अनुक्रमे ई-कॉमर्स आणि टेक स्टार्ट-अप ५९ टक्के, दूरसंचार ५३ टक्के आणि अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा ५० टक्के आहेत.

या सेक्टरमध्ये मिळणार संधी
आयटी सेक्टरशिवाय पुढील सहा महिन्यांत, उत्पादन, ई-कॉमर्स, टेलिकॉम, फार्मास्युटिकल्स इत्यादी इतर अनेक क्षेत्रांमध्ये विविध नोकऱ्यांसाठी भरती वाढू शकते. अनेक परदेशी कंपन्या भारतभर इलेक्ट्रॉनिक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी १,२०० मिलियन डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक करत आहेत. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रात २०,००० हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, 5G बूममुळे भारताच्या दूरसंचार बाजारपेठेतील मोठ्या कंपन्यांमध्ये प्रवेश करणाऱ्यांसाठी १,००० पेक्षा जास्त नोकरीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे, असंही टीमलीज प्लॅटफॉर्मने म्हटले आहे.

याशिवाय, टीमलीज अहवालाच्या अंदाजानुसार, भारतीय सल्लागार कंपन्यांनी चालू अर्ध्या वर्षात व्यवसाय ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, क्लाउड तंत्रज्ञान, डेटा सायन्स इ. यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये ५,००० हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करणे अपेक्षित आहे.

 


2023 या वर्षावर काहीसं मंदीचं सावट असल्याची चिन्हं असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 2022 मध्ये अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याने परिस्थिती आधीच बिकट आहे; मात्र काही आशेचे किरणही दिसत आहेत. गुगल तसंच एचसीएल टेक या कंपन्यांनी कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. गुगल कंपनीला वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी हवे असून, एचसीएल टेक कंपनीला पुणे कार्यालयासाठी कर्मचारी हवे आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ या. ‘कंटेंट डॉट टेक गिग डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Google Jobs 2023

भारतातल्या प्रमुख तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये गुगलचाही समावेश होतो. कारण गुगल कंपनी संपूर्ण वर्षभर भारतातून अनेक नव्या तंत्रज्ञांची भरती करत असते. आता कंपनीने जाहीर केलेली भरती टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी आहे. तसंच, ही जबाबदारी उमेदवारांनी घरून काम करून म्हणजेच वर्क फ्रॉम होम करून सांभाळायची आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी गुगल कंपनीशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • या उमेदवारांनी काय काम करणं अपेक्षित आहे, याबद्दलही थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.
  • उत्तर अमेरिकेतल्या बाजारपेठांमध्ये फिल्ड टेस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सेल्युलर सिस्टीम व्हॅलिडेशनचं व्यवस्थापन आणि नेतृत्व.
  • – दिलेल्या वेळेत प्रोग्राम्स, प्रोजेक्ट्स, प्रॉडक्ट्सची उद्दिष्टं गाठण्यासाठी टेक्निकल जजमेंट
  • – टेस्टिंग प्रोग्रेसमध्ये दर्जाबद्दलची माहिती स्टेकहोल्डर्सना देणं, फिल्ड ऑटोमेशनच्या संधी ओळखणं, तसंच फिल्ड ऑटोमेशन टूल्स आणि प्रोसेसेस विकसित करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं.
  • – 5G R15/R16 कॅरिअर फीचर्सचं समरायझेशन, डेटा विश्लेषण, बग रिपोर्टिंगचं व्यवस्थापन करून पिक्सेल मॉडेम क्वालिटी राखणं.
  • – वेगवेगळ्या प्रदेशांतल्या फिल्ड टेस्ट्समधल्या 5G/4G लॉग्जचं विश्लेषण करणं, महत्त्वाच्या समस्या ओळखणं आणि त्या सोडवण्यासाठी सॉफ्टवेअर टीमसोबत काम करणं

HCL tech Vacancy 2023

एचसीएल टेक ही भारतीय मल्टिनॅशनल इन्फोटेक सर्व्हिसेस आणि कन्सल्टिंग कंपनी आहे. तिचं मुख्यालय नोएडात आहे. ही कंपनी सध्या पुणे कार्यालयात सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची भरती करत आहे.

पात्रता :

  • – बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी असणं आवश्यक.
  • – या क्षेत्रात 0-2 वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • – विकेंद्रित टीममध्ये Agile/Scrum टेक्निक्स वापरून लार्ज स्केल सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्याची क्षमता आवश्यक.
  • – क्रिएटिव्ह विचार करून सोल्युशन्स काढता आली पाहिजेत.
  • – CSS, Angular, EXTJS, Bootstrap, JQuery यांची माहिती असल्यास उत्तम; मात्र हे अत्यावश्यक नाही.
  • – JSP, Servlet, Tag Library, XSLT, and Restful APIs यांबद्दल माहिती असल्यास उत्तम.

जबाबदाऱ्या :

  • – बग्ज आणि इतर समस्या सोडवून प्रोजेक्ट सुरळीतपणे सुरू ठेवणं
  • – ग्राहकांच्या गरजा जाणून घेणं आणि त्या कोडमध्ये परिवर्तित करणं.
  • – टास्क रेकॉर्डिंग क्रिएट अँड सबमिट सोर्स कोड्सचं व्यवस्थापन
  • – एचसीएल टेक कंपनीत भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा.

📝 अर्ज करा


 

IT Company Mega Recruitment 2023

IT Company Mega Recruitment 2022: Good news for job seekers!! There is good news for the youth who are looking for a job in the IT sector. ‘The Indian IT industry will hire 2 lakh workers in the coming period amid problems like inflation and recession in the US.’ IT giants like Wipro, HCL, Tech Mahindra, Infosys, and TCS have made their stance clear on moonlighting. Further details are as follows:-

IT Jobs 2023

आर्थिक मंदीमुळं (Economic Downturn) कंपन्या मोठ्या प्रमाणावर काम बंद करत आहेत. मात्र, भारतीय आयटी क्षेत्र (Indian IT Sector) वेगळ्याच मुद्द्यावरुन चर्चेत आहे. भारतीय कंपन्यांमध्ये ‘मूनलाइटिंग’ ही एक मोठी समस्या बनलीय. त्यामुळं अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गजांनी मूनलाइटिंगवर आपली भूमिका स्पष्ट केलीय. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • असं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय.
  • मात्र, आता आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांनी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आशेचा किरण दाखवलाय.
  • बंगळुरू टेक समिटच्या कार्यक्रमात (Bengaluru Tech Summit) बोलताना गोपालकृष्णन म्हणाले, ‘भारतीय आयटी उद्योग महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांदरम्यान आगामी काळात 2 लाख कर्मचारी नियुक्त करेल.’

IT Field Recruitment 2023

गोपालकृष्णन पुढं म्हणाले, ‘भारतीय आयटी उद्योग $220 बिलियन कमाईच्या आधारावर 8-10 टक्के दरानं वाढण्याची अपेक्षा आहे. AI/ML, Blockchain, Web 3.0, Metaverse सह तंत्रज्ञान क्षेत्र प्रगती करत आहे. त्यामुळं हा उद्योग वाढतच जाईल, असा माझा विश्वास आहे. लेऑफ मार्केटमध्ये फारच अल्पकालीन चढउतार आहेत. मी भविष्याबद्दल खूप आशावादी आहे.’

  • म्हैसूर, मंगळुरू, बेळगांव आणि हुबळी इथं छोटी कार्यालये उघडून कंपन्या आव्हानांवर मात करत असल्यानं आयटी क्षेत्र सुरक्षितपणे वाढणार असल्याचंही इन्फोसिसचे सह-संस्थापक म्हणाले.
  • त्यांनी भारतातील सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) सारख्या खासगी उद्योजकांच्या अद्वितीय मॉडेलचं कौतुक केलं.
  • वास्तविक, गेल्या काही महिन्यांत फेसबुक, मेटा, अॅमेझॉन सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावरून काढून टाकलं आहे.

Previous Update –

बेरोजगारांकरिता खुशखबर – IT कंपनी तब्बल 5000 जागांवर करणार भरती!!

IT Company Mega Recruitment 2022: Good news for job seekers. This is a big opportunity for work in an IT Company. 5000 posts have been announced to be recruited. The Expleo Company will be going to recruit 5000 posts. Further details are as follows:-

Expleo Recruitment 2022

IT क्षेत्रात जॉब्सही प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. म्हणूनच एका नामांकित IT कंपनीनं आता तब्बल 5000 जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

IT Jobs 2022

या वर्षी पास आउट होणाऱ्या किंवा यानंतरच्या दोन वर्षातील पास आउट उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर आहे. सध्याच्या काळात जोमात सुरु असलेली IT इंडस्ट्री आता अधिकच जोर धरू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात जॉब्सही प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. म्हणूनच एका नामांकित IT कंपनीनं आता तब्बल 5000 जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली आहे.

  • पुढील तीन वर्षांच्या कालावधीत, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि सल्लागार सेवा देणारी जागतिक कंपनी Expleo भारतात पाच हजार लोकांना कामावर घेणार आहे.
  • जवळपास गेल्या वर्षी, भारतातील कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त विस्तार केला आहे, 2,000 पेक्षा जास्त नवीन कर्मचारी आणि वीस नवीन क्लायंटस मिळवले आहेत.
  • एक्स्प्लेओने आपल्या ग्राहकांना विविध क्षेत्रात मदत करण्यासाठी भारतातील सहावे वितरण आणि उत्कृष्टता केंद्र, कोईम्बतूर येथे उघडले आहे.
  • कंपनीचे डिजिटल आणि डिजिटल क्षमतांमधील गुंतवणुकीवर वाढलेले लक्ष यामुळे हा विस्तार सक्षम झाला आहे.
  • कंपनी भारतात आपल्या संघाचा विस्तार करत आहे आणि तिच्या भरतीच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादावर अवलंबून आहे.

Expleo Bharti 2022 | Expleo Jobs 

विकास, ऑटोमेशन, अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड आणि डेटा सायन्स क्षेत्रात काम करून ऑटोमोटिव्ह, बँकिंग, वित्तीय सेवा, एरोस्पेस, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान यासह उद्योगांमधील सद्यस्थितीला लोकांचा मोठा समूह व्यत्यय आणेल.

  • डिजिटल परिवर्तनाचे स्वागत करण्याच्या उद्देशाने नवीन कामावर घेण्याच्या योजना आहेत.
  • तिच्या टॅलेंट स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून, कंपनी आपल्या क्लायंट आणि भागीदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अलीकडील पदवीधर आणि अनुभवी व्यावसायिकांचे मिश्रण घेईल.
  • एक्स्प्लेओ इंडियाच्या सध्याच्या ऑपरेशन्सचा विकास करणे ही कंपनीच्या प्रादेशिक आणि जगभरातील विस्ताराची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढील तार्किक पाऊल आहे.
  • एक्स्प्लेओ शाश्वत व्यावसायिक प्रगती सक्षम करण्यासाठी कर्मचारी शिक्षण आणि विकासामध्ये गुंतवणूक करते.
  • हे क्रॉस-फंक्शनल प्रोजेक्ट्सपासून अतिरिक्त जबाबदाऱ्या घेण्याच्या सोप्या कृतीपर्यंत काहीही असू शकते.
  • कंपनी अत्याधुनिक कार्य संस्कृती, एक उदार लाभ पॅकेज आणि आंतरराष्ट्रीय एक्सपोजर ऑफर करण्याचा दावा करते.

नामांकित IT कंपनी भारतात करणार 10,000 जागांसाठी भरती!! IT Company Mega Recruitment 2022

IT Company Mega Recruitment 2022: Good news for job seekers. This is a big opportunity for job seekers. The Salesforce Company will be conducting recruitment soon for 10,000 posts. Salesforce has announced to soon recruit 10,000 vacancies in India. Further details are as follows:-

Salesforce Company Bharti 2022

IT क्षेत्र आणि IT नोकऱ्या सध्या जोमात आहेत. प्रत्येक जण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IT क्षेत्राकडे वळू लागला आहे. त्यात मोठमोठ्या IT कंपन्या भारतात तरुणांच्या शोधात येत आहेत आणि नोकऱ्या देत आहेत. अशीच एक नामांकित कंपनी Salesforce नं भारतात लवकरच तब्बल 10,000 जागांसाठी भरती करण्याची घोषणा केली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Salesforce Recruitment 2022-2023

  • सेल्सफोर्स इंडियाने घोषणा केली आहे की फर्म 2023 च्या सुरूवातीस त्यांची संख्या 10,000 पर्यंत वाढवेल.
  • सध्या, फर्ममध्ये 7,500 कर्मचारी आहेत आणि जानेवारी 2023 पर्यंत त्यांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याची योजना आहे, अरुंधती भट्टाचार्य, सेल्सफोर्सच्या सीईओ आणि चेअरपर्सन यांनी सांगितलं आहे.
  • भट्टाचार्य पुढे म्हणाल्या की सेल्सफोर्स इंडिया मुख्यत्वे बँकिंग सेवा, वित्तीय सेवा, उत्पादन सेवा आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल.
  • सेल्सफोर्सने महामारीच्या काळात भारतात 2500 वरून 7500 पर्यंत त्यांचे कर्मचारी लक्षणीयरीत्या वाढवले ​​आहे.
  • सेल्सफोर्सने महामारीच्या काळात भारतात 2500 वरून 7500 पर्यंत त्यांचे कर्मचारी लक्षणीयरीत्या वाढवले ​​आहेत.
  • भट्टाचार्य पुढे म्हणाल्या की, फर्म ऑफिसमधून काम करण्यावर भर देत आहे कारण फर्मचा विश्वास आहे की ऑफिसमधून काम केल्याने सहयोग आणि आपुलकीची भावना वाढते.
  • काही प्रमाणात कार्यरत हायब्रीड देखील कामगारांमध्ये तितकेच महत्वाचे आहे.

भारतात, कार्यालयातून काम करण्याचा अधिक फायदा घेईल परंतु कर्मचार्‍यांसाठी घरून काम करणे देखील सुरू राहील अशी माहिती अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे. भारतीय तरुणांनी पुढील कौशल्ये शिकली पाहिजेत याविषयी विचारले असता, तिने सुचवले की तरुण तंत्रज्ञांनी खास तंत्रज्ञान कौशल्ये शिकली पाहिजे जी विशेषतः SaaS कंपन्या आणि क्लाउड-आधारित कंपन्यांमध्ये महत्त्वाची आहेत. भट्टाचार्य यांनी हे देखील अधोरेखित केले की विश्लेषण आणि एकत्रीकरण यासारख्या कौशल्यांना खूप मागणी आहे. त्यांच्या मते सायबरसुरक्षा हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जेथे कौशल्यांना खूप मागणी आहे कारण ही अशी गोष्ट आहे ज्याची कोणीही काळजी घेत नाही आणि या क्षेत्रात विकसित केल्याने फर्मची वाढ होऊ शकते.


IT Company Mega Recruitment 2022

IT Company Mega Recruitment 2022: This is a great opportunity for job seekers!! There are a total of 5 Lakh new vacancies on Amazon, and Flipkart. Shadowfax Technologies, which works with online marketplaces like Flipkart, Ajio, Zepto, Swiggy, Zomato and Domino’s, plans to hire 105,000 delivery agents in the next three months. Further details are as follows:-

खुशखबर – अॅमेझॉन, फ्लिपकार्ट मध्ये 5 ते साडे 5 लाख नवीन जागा!!

मोठ्या संख्येने तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे कारण सर्व उद्योगातील कंपन्या करोनानंतरच्या हंगामी खरेदीत अपेक्षित वाढ पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवत आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान पाच ते साडेपाच लाख नवीन तात्पुरत्या नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुढील तीन महिन्यांत 105,000 डिलिव्हरी एजंट्सची नियुक्ती 

  • डेटा रिटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, वेअरहाउसिंग, बँकिंग आणि वित्तीय सेवा (BFSI) यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
  • “कंपन्यांनी मनुष्यबळ बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे कारण त्यांना त्यांच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे.
  • हा सणाचा हंगाम गेल्या तीन वर्षांतील पहिला असेल जेव्हा बहुतेक लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले आहे.
  • कोविड-प्रेरित निर्बंध हटवण्यात आले आहेत, गतिशीलता सुधारली आहे आणि महासाथीची भीती कमी झाली आहे,” असे मॅनपॉवरग्रुप इंडियाचे विक्री, खाते व्यवस्थापन आणि जागतिक खात्यांचे वरिष्ठ संचालक आलोक कुमार म्हणाले.
  • गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या महिन्यांच्या तुलनेत सुमारे २०-२५% नोकऱ्यांची ही वाढ आहे.
  • सुमारे 70% मागणी किंवा ३ लाख ५० हजार नवीन नोकर्‍या डिलिव्हरी, लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग सेगमेंटमध्ये असण्याचा अंदाज आहे.
  • Amazon, Shadowfax Technologies, Ecom Express, आणि Flipkart सारख्या कंपन्या स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांची फळी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Shadowfax Technologies, जे Flipkart, Ajio, Zepto, Swiggy, Zomato आणि Domino’s सारख्या ऑनलाइन मार्केटप्लेससह काम करते, पुढील तीन महिन्यांत 105,000 डिलिव्हरी एजंट्सची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे.

“आम्ही फॅशन, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स/मोबाइल फोन, पुस्तके, किराणा सामान, अन्न, गृह फर्निशिंग आणि लहान मुलांच्या उत्पादनांसह विविध श्रेणींमधून चांगली मागण पाहात आहोत,” असे शॅडोफॅक्सचे सह-संस्थापक आणि ऑपरेशन्सचे प्रमुख प्रहर्ष चंद्रा म्हणाले.


खुशखबर – अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती!! – IT Company Mega Recruitment 2022

IT Company Mega Recruitment 2022 : Good News for job seekers. The new mega recruitment will be conducted at Amazon, Flipkart, and Walmart. Interested and eligible candidates apply now. The name of the posts is Software Development Engineer and Senior Software Development Engineer. Further details are as follows:-

IT Company Bharti 2022 

आयटी क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि वॉलमार्ट या तीन आयटी कंपन्यांनी भरती काढली आहे. इच्छूक आणि पात्र तरुण या संधींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. फ्लिपकार्ट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदासाठी भरती करत आहे, तर अमेझॉनने सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर या पदासाठी भरती काढली आहे.

फ्लिपकार्ट (Flipkart) :-

  • फ्लिपकार्टने बेंगळूरू लोकेशनसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर (Software development engineer) या पदासाठी भरती काढली आहे.
  • पात्रता
    • बी.टेक. किंवा एम.टेक. आणि किमान तीन वर्षांचा अनुभव.
    • चांगल्या स्कोपसाठी चुकाविरहित अॅबस्ट्रॅक्शन्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स क्रिएट करणं – SQL, C++, Ruby, Java, Clojure, Scala यांच्यापैकी कोणतंही एक्स्टेन्सिव्ह प्रोग्रॅमिंग नॉलेज असणं आवश्यक
    • स्ट्राँग प्रोग्रॅमिंग क्षमता आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड दृष्टिकोन असावा
    • कॉन्करन्सी आणि मल्टी-थ्रेडिंगच प्रोग्रॅमिंग ज्ञान.
    • क्लिष्ट बिझनेस प्रोसेस आणि मोठ्या प्रमाणात डेटा हँडल करण्याची क्षमता.
    • पैसे नाहीत म्हणून शिक्षण सोडू नका; बघा देशातली सर्वांत कमी फी असलेली 10 कॉलेजेस

IT Jobs 2022 – Roles and Responsibilities:

  • प्रॉडक्ट स्पेसिफिकेशनुसार डिझाईन एलिमेंट आणि त्याचं बजेट तयार करणं
  • एक्स्टेन्सेबल लो डिझाईन तयार करणं, स्वतंत्रपणे इतर पर्याय विकसित करणं
  • सुपरव्हिजनखाली उच्च दर्जाचं डिझायनिंग करता यावं.
  • टीममधीन नवीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणं तसंच गरजेनुसार प्रशिक्षण देणं
  • वेगवेगळ्या इतर टीम्ससोबत काम करताना ठरलेला उद्देश साध्य करण्यासाठी विविध विषयांच्या टीममधील सदस्यांना मदत करणं.

अमेझॉन (Amazon) :-

1. Sr.Software Development Engineer 

  • Sr.Software Development Engineer चेन्नई लोकेशनसाठी हवे आहेत.
  • पात्रता : –
    • सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचा 4+ वर्षांचा अनुभव – तीन किंवा अधिक वर्षांपेक्षा जास्त किमान एका सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग भाषेत काम केलेलं असावं.
    • टेक लीड म्हणून काम केलेलं असल्यास, इंजिनीअरच्या टीमला मार्गदर्शन केलेले असल्यास प्राधान्य.

Roles and responsibilities: – Jobs in IT Company

  • सॉलिड आणि एफिशिअंट मेन्टेनन्स कोड तयार करणं.
  • अॅलेक्साचा वापर करण्यासाठी डेव्हलपर्स आणि व्यवसायांना मदत करणं.
  • अॅलेक्सा व्हॉईस सर्व्हिससाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन करणं.
  • नवीन सेवा, प्लॅटफॉर्म आणि फ्रेमवर्क्ससाठी फीचर विकसित करून ती वापरणं
  • टीममधील सदस्यांना मार्गदर्शन करून युनिट टेस्ट कव्हरेज, कोड डॉक्युमेंटेशन व्यवस्थितपणे केलं जाईल, याची काळजी घेणं
  • विषयाशी संबंधित सर्वांना टेक्निकल आयडिया समजावून सांगणं.

वॉलमार्ट (Walmart)

  • Software engineer – UI development
  • पात्रता:
    • फ्लक्स किंवा रेडक्स वापरून आणि Java-आधारित वेब डेव्हलपमेंट स्किल्स आणि प्रॅक्टिकल अनुभव असावा.
    • JavaScript ची विशेषतः DOM आणि JavaScript ऑब्जेक्ट मॉडेलची चांगली समज.
    • HTML5, CSS3, Bootstrap 4, React.js आणि त्याच्या फंडामेंटल कन्सेप्ट्सचं ज्ञान आवश्यक.
    • कॉमन React.js वर्कफ्लोचा अनुभव, डेस्कटॉप आणि मोबाइल वेब अॅप्लिकेशन्स (फ्लक्स किंवा रेडक्स) डेव्हलप करण्याची माहिती असलेल्यांना प्राधान्य.
    • ECMAScript रिक्वायरमेंट्सचे ज्ञान असल्यास उत्तम.
    • डेटा स्ट्रक्चर लायब्ररीबद्दल माहिती (उदा. Immutable.js)
    • Isomorphic React बद्दल माहिती असल्यास प्राधान्य.

Roles and responsibilities – IT Company Recruitment 2022

  • तुम्ही टेक्नॉलॉजीबद्दल पॅशनेट असायला हवं.
  • नवीन जबाबदाऱ्या घेऊन तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं
  • तुमचं संवाद कौशल्य उत्कृष्ट असायला हवं.
  • त्याचबरोबर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विश्लेषण क्षमता आणि निर्णयक्षमता उत्तम असावी.
  • स्वयंप्रेरणेने नवउद्योजकाच्या तडफेने विविध जबाबदाऱ्या स्वीकारायची तयारी असावी.
  • टेक्निकल असोसिएट्सना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून उच्च दर्जाचं काम करवून घेण्याची क्षमता तुमच्यात असावी.
  • तुम्ही वर दिलेल्या पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हीही या तिन्ही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता.

IT Company Mega Recruitment 2022

IT Company Mega Recruitment 2022: TCS, India’s largest IT services company, will hire 40,000 employees. Another major company, Infosys, plans to create more than 50,000 jobs in the current financial year. Further details are as follows:-

खुशखबर – TCS, Infosys या वर्षात 90,000 नोकऱ्या देणार!! जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी TCS 40,000 कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार आहे. आणखी एक प्रमुख कंपनी Infosys चालू आर्थिक वर्षात 50,000 हून अधिक नोकरीच्या संधी देण्याचा विचार करत आहे. 

TCS Infosys Company Jobs 2022

माहिती तंत्रज्ञान उद्योगाला सध्या चांगले दिवस आले आहेत. मात्र, अशातच कर्मचाऱ्यांचं नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यावर मात करण्यासाठी कंपन्या त्यांची नवीन भरती वाढवत आहेत. भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी TCS 40,000 कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार आहे. आणखी एक प्रमुख कंपनी Infosys चालू आर्थिक वर्षात 50,000 हून अधिक नोकरीच्या संधी देण्याचा विचार करत आहे. मार्च 2022 तिमाहीत इन्फोसिसचा अ‍ॅट्रिशन रेट (कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचं प्रमाण) 27.7 टक्क्यांवर पोहोचला. हा दर डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 25.5 टक्के होता. 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत, TCS ची कर्मचारी गळती 17.4 टक्के होती, एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत ती केवळ 7.3 टक्के होती. डिसेंबर 2021 च्या तिमाहीतही, TCS चं हे प्रमाण 15.3 टक्के होतं. टीसीएस व्यवस्थापनाने सांगितलं की, शेवटच्या-बारा-महिन्याच्या (एलटीएम) आधारावर ही संख्या जास्त आहे.

  • इन्फोसिस व्यवस्थापनाचंही हेच म्हणणं आहे. TCS आणि Infosys द्वारे नव्याने भरती करण्याच्या बाबतीत, कंपन्यांनी FY21 मध्ये एकूण 61,000 कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले. हे FY22 मध्ये अनेक पटींनी वाढले आणि ते पुढेही तसेच राहण्याची शक्यता आहे.
  • TCS आणि Infosys ने FY22 मध्ये अनुक्रमे 100,000 आणि 85,000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली.
  • हे Ammonia गॅस गळती; श्वास घेण्यास त्रास, डझनभर लोकं रुग्णालयात दाखल Infosys नं म्हटलं आहे की, ते FY23 मध्ये 50,000 हून अधिक फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याच्या विचारात आहेत.
  • “गेल्या वर्षात, आम्ही संपूर्ण भारत आणि जागतिक स्तरावर 85,000 फ्रेशर्सना कामावर घेतलं आहे.
  • आम्ही कमीत कमी 50,000 (या वर्षी) पेक्षा जास्त उमेदवारांना कामावर घेण्याची योजना आखत आहोत आणि याचा कसा परिणाम होतो, ते पाहू.
  • तसंच हे फक्त सुरुवातीचे आकडे आहेत,” असं इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय म्हणाले.

त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. टीसीएसने असंही म्हटलं आहे की, पुढे जाऊन, त्याची नवीन तरुणांना नोकरीची संधी देण्याची गती मागील आर्थिक वर्षासारखीच असेल. कंपनी वर्षाची सुरुवात 40,000 भरतीचे लक्ष्य घेऊन करत आहे आणि वर्षभरात गरज पडल्यास ती वाढवेल, असे TCS चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. जी. सुब्रमण्यम यांनी सांगितलं.

TCS ने असंही म्हटलं आहे की, कंपनी त्यांचे भविष्यवादी आणि पाथ-ब्रेकिंग 25X25 मॉडेल स्वीकारण्यासाठी वचनबद्ध आहे. या मॉडेलचा अर्थ आहे की, कंपनीच्या 25 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना केव्हाही ऑफिसमधून काम करणं आवश्यक नाही आणि त्यांना त्यांच्या वेळेतील 25 टक्क्यांहून अधिक वेळ ऑफिसमध्ये घालवण्याची गरज नाही. हे भाषण करतानाच रतन टाटा झाले Emotional,आयुष्यातील शेवटची वर्षे… TCS ऑकेजनल ऑपरेटिंग झोन (OOZ) आणि हॉट डेस्क देखील सेट करत आहे. हे जगभरात बदलत्या कामाच्या जागा (agile work seats) सेट करत आहे, याच्यामुळे कंपनीतील लोकांना आणि सहयोगींना काम करण्यासाठी कोणत्याही TCS कार्यालयात जाण्याची परवानगी मिळेल. प्रमुख IT कंपनी Infosys ने असंही म्हटलंय की, ते “कार्यालयात टप्प्याटप्प्याने परत येण्याची” योजना आखत आहेत, याच्यामुळे त्यांच्या कर्मचार्‍यांना आठवड्यातून एक किंवा दोन दिवस वैयक्तिकरित्या कार्यालयात हजर रहावं लागेल. मात्र, कंपनी दीर्घकाळासाठी कामाचे हायब्रिड मॉडेल स्वीकारत आहे


IT Company Mega Recruitment 2022

IT Company Mega Recruitment 2022 : Companies like TCS, and Infosys have announced mega recruitment for freshers in IT sector. It will now rain jobs in the IT sector for freshers. As many as 360,000 freshers are expected to get jobs in the IT sector (lacs of freshers jobs in IT). Further details are as follows:-

Mega Recruitment for Freshers in IT Sector

सध्याच्या काळात दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रापेक्षा IT क्षेत्रात नोकरीच्या (Jobs and salaries in IT sector) अनेक संधी उपलब्ध आहेत. कोरोनाकाळात सरासरी सर्वच क्षेत्रांमध्ये मंदी आली. काही क्षेत्रांमध्ये तर अक्षरशः पैशांची वानवा होती. मात्र याचवेळी IT क्षेत्रातील टॉप कंपन्या (Top companies in IT sector) भरघोस पैसे कमवत होत्या. म्हणजेचज कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही IT कंपन्या जोमात सुरु होत्या.

म्हणूनच आता काही IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जॉब्सच्या संधी (Career in IT companies in India) देण्यास सुरुवात केली आहे. TCS, Infosys सारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची भरती (Mega recruitment for freshers in IT sector) करण्याची घोषणा केली आहे. त्यात आता फ्रेशर्ससाठी ही IT क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. तब्बल 3,60,000 फ्रेशर्सना IT क्षेत्रात जॉब (lacs of freshers jobs in IT) मिळणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

IT Company Mega Recruitment 2022

Career in IT Companies in India

विविध कारणांमुळे अलीकडच्या काही दिवसांत आयटी फर्मचा अट्रिशन रेट (Attrition Rate in IT companies) थोडा जास्त आहे. कंपनीचा अ‍ॅट्रिशन रेट म्हणजेच कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून राजीनामा देऊन निघून जाणे. हा अॅट्रिशन रेट कंपनीच्या टर्नओव्हर रेटवर परिणाम करेल. म्हणूनच, अनेक कंपन्या अॅट्रिशन रेट कमी करण्याचा विचार करत आहेत.

Infosys Jobs 2022

  • Infosys कंपनीनं येणाऱ्या आर्थिक वर्षात तब्बल 55,000 फ्रेशर्सना (Infosys recruitment for 55,000) जॉब देणायचा नेत्रांनी घेतला आहे.
  • तर TCS, Wipro आणि इतर कंपन्यांनीही येणाऱ्या आर्थिक वर्षात अनेक फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • Capgemini कंपनीमध्ये भारतासह 50 पेक्षा जास्त देशांमध्ये एकूण प्रमुख संख्या सुमारे 2 लाख 90,000 आहे.
  • भारतात, या कंपनीमध्ये सुमारे 1 लाख 25,000 कर्मचारी काम करत आहेत.
  • अधिक माहिती – मोठी संधी! इन्फोसिसमध्ये होणार 55 हजार जणांची नोकर भरती!

It is one of the leading IT firms in India as it provides career growth (Capgemini) to big experts. So now the company has decided to hire more employees. In addition, other IT companies will offer jobs to candidates working on new technologies. Therefore, in the coming financial year, there will be more candidates seeking jobs and careers in IT sector than in other sectors.


IT Company Jobs 2022

IT Company Mega Recruitment 2022 : A large number of jobs will be created in the IT sector in the coming year. Job creation in the IT sector is on the rise. Leading companies aim to hire freshers. Further details are as follows:-

आगामी वर्षात आयटी क्षेत्रात मोठ्या संख्येने नोकऱ्या उपलब्ध असणार आहेत. आयटी क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठ्या प्रणामात होत आहे. आघाडीच्या कंपन्यांनी फ्रेशर्सना नोकरी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) आघाडीच्या पाच कंपन्यांनी आगामी आर्थिक वर्षात (२०२२-२३) १.८२ लाख नवोदितांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. ‘डिजिटायझेशन’मुळे ‘आयटी’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारांची निर्मिती होत आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस), एचसीएल टेक, विप्रो, टेक महिंद्र आणि इन्फोसिस या कंपन्यांनी डिसेंबर २०२१अखेर संपलेल्या तिमाहीत चांगला महसूल प्राप्त केला आहे.

 

Last year, the same companies had provided employment opportunities to 80,000 newcomers. In comparison, 120 per cent more jobs will be created in the coming financial year.

Infosys Jobs 2022

‘इन्फोसिस’ देणार २१ हजार रोजगार

आयटी क्षेत्रातील आघाडीच्या ‘इन्फोसिस’ने गेल्या वर्षी २१ हजार जणांना रोजगार दिला. चालू वर्षात कंपनी ५५ हजार रोजगारांची निर्मिती करणार आहे. याचा अर्थ यंदा दुपटीहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘विप्रो’ने यंदा १७,५०० नवे रोजगार देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी कंपनीने केवळ नऊ हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या होत्या.

HCL Jobs 2022

‘एचसीएल’ देणार २२ हजार नोकऱ्या

‘एचसीएल टेक’तर्फे आगामी आर्थिक वर्षात २२ हजार नव्या नोकऱ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने १२ हजार नोकऱ्या दिल्या होत्या. ‘टेक महिंद्र’ने गेल्या वर्षी उपलब्ध केलेल्या नोकऱ्यांचा तपशील उपलब्ध नाही. मात्र, यंदा कंपनी १० हजार नोकऱ्यांची निर्मिती करणार आहे. डिसेंबर २०२१अखेर पाच आयटी कंपन्यांनी २.३० लाख कर्मचाऱ्यांची भरती केली.

आयटी कंपन्यांची नोकरभरती (जानेवारी ते डिसेंबर २०२१)

कंपनी कर्मचारी 

  • टीसीएस ८७,७२५
  • इन्फोसिस ४२,७५५
  • विप्रो ४१,३६३
  • एचसीएल टेक ३८,०९५
  • टेक महिंद्र २३,९७६
    • एकूण २,३३,९१४

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

15 Comments
  1. Mahesh Thakare says

    Mi 12th pass ahe

  2. Narendra khobragade says

    12 pass & welder Express

  3. Narendra khobragade says

    12 pass & welder Express

  4. Rakesh says

    Prmnt job ahe ka sir ki cantract base job ahe aani mla job chi khup aavshakta ahe plz

  5. Amol Surekar says

    Any vacancy for Dip Automobile Engg plz tell me

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड