JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

इस्रायलमध्ये ३,५०० ‘होम-बेस्ड केअरगिव्हर’ पदांसाठी थेट भरती; महिन्याला जवळपास २ लाख वेतन – Israel Job Opportunities For Chhattisgarh

Israel Job Opportunities For Chhattisgarh

भारत-इस्रायल फ्रेमवर्क करारांतर्गत इस्रायलमध्ये ३,५०० ‘होम-बेस्ड केअरगिव्हर’ पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) आणि छत्तीसगड शासनाच्या कौशल्य विकास, तांत्रिक शिक्षण व रोजगार विभागाच्या माध्यमातून ही भरती राबविण्यात येत आहे. परदेशात रोजगार शोधणाऱ्या युवकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला सुमारे २ लाख रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. वैद्यकीय विमा, निवास आणि भोजन यांसारख्या सुविधांसाठी कपात झाल्यानंतर उमेदवारांना सुमारे १,९९,७७० रुपये निव्वळ पगार मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रारंभी दोन वर्षांचा करार असणार असून गरजेनुसार त्यामध्ये मुदतवाढ दिली जाऊ शकते.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि इंग्रजी विषयाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. याशिवाय अर्जदाराकडे किमान तीन वर्षे वैध असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, उंची १.५ मीटरपेक्षा जास्त आणि वजन ४५ किलोपेक्षा अधिक असावे, असे निकष ठेवण्यात आले आहेत.

केअरगिव्हर क्षेत्रातील प्रशिक्षणही आवश्यक करण्यात आले आहे. ९९० तासांचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) असलेले केअरगिव्हर प्रमाणपत्र किंवा ANM, GNM, बीएससी नर्सिंग, फिजिओथेरपी किंवा नर्स असिस्टंट यांसारखी पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेल्या उमेदवारांना मात्र या भरतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून त्यामध्ये ऑनलाइन नोंदणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि इस्रायली नियोक्त्यांकडून व्हिडिओ मुलाखत यांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी छत्तीसगड ई-रोजगार पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, या भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन रोजगार विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी शासकीय रोजगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड