JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आर्मीत सैनिक, लिपिक, शेफसह विविध पदांसाठी १ डिसेंबरपर्यंत सरळ भरती प्रक्रिया सुरु!

Indian Army Recruitment Drive Nashik Devlali 2025 – नाशिक रोड येथील देवळाली कॅम्प येथे लष्कराच्या तीन इन्फंट्री बटालियनसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील हजारो तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या तीन इन्फंट्री बटालियनसाठी विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी (ता. १८) महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजारांहून अधिक तरुणांनी या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील तरुणांचा यात समावेश होता. या भरती मुले हजारो तरुणाच्या नोकरीच्या आहसी पल्लवित झाल्या आहेत. या साठी मोठ्या संख्येने उमेदवार हजेरी लावत आहेत. 

 

Indian Army nashik Bharti
देवळाली कॅम्प येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यासह परराज्यातील तरूणांची मोठी उपस्थिती भरतीला आहे. कडाक्याच्या गारठ्यातही हे युवक भरतीसाठी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. निवाऱ्याची सोय नसल्यामुळे अनेक तरुण मिळेल त्या ठिकाणी घेत विश्रांती घेत आहेत. निवारा नसलेल्या या तरुणांनी जवळपास पालापाचोळा जमा करून शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना रात्रीच्या वेळी दिसून आले. नाशिक रोड रेल्वे स्थानक, बस स्थानक अशा ठिकाणी भरतीसाठी आलेल्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

देवळाली कॅम्प येथे ११६ इन्फंट्री बटालियन टीए पॅरा, ११८ इन्फंट्री बटालियन (टीए) ग्रेनेडियर्स आणि १२३ इन्फंट्री बटालियन (टीए) ग्रेनेडियर्स या तीन युनिटमध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती प्रक्रिया १ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये सैनिक (जनरल ड्युटी) ३०३ पदे, सैनिक (लिपिक) १६ पदे, लिपिक २ पदे, शेफ कम्युनिटी ५ पदे, शेफ स्पेशल २ पदे, मेस कूक १ पद, आर्टिशन वुडवर्क १ पद, हाऊस किपर १ पद, हेअर ड्रेसेस २ पदे आणि वॉशरमन २ पदे अशा विविध पदांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी राज्य व परराज्यांतून आलेल्या तरुणांना सावन कृपाल रूहानी मिशन व दर्शन स्कूल ॲकॅडमीतर्फे सामाजिक दायित्व निभावत मदतीचा हात देण्यात आला. या संस्थांमार्फत दररोज एक हजार २०० उमेदवारांसाठी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे.

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड