INCOIS मध्ये शास्त्रज्ञ व प्रकल्प सहाय्यक शास्त्रज्ञ पदांची भरती!

INCOIS Bharti 2021 Details – इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (Indian National Center for Ocean Information Services – INCOIS) ने विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट आणि प्रोजेक्‍ट सायंटिफिक असिस्टंटच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. (Jobs) या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार INCOIS ची अधिकृत वेबसाइट incois.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया चालू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर आहे.

INCOIS भरती मोहिमेद्वारे एकूण 82 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यापैकी 7 पदे प्रोजेक्‍ट सायंटिस्ट III च्या पदासाठी आणि 15 पदे प्रोजेक्‍ट सायंटिस्ट II च्या पदासाठी आहेत. याशिवाय 40 प्रकल्प शास्त्रज्ञांच्या पदांवर नेमणुका केल्या जातील. तर 5 सहाय्यक प्रकल्प सहाय्यक शास्त्रज्ञ II च्या पदासाठी आणि 15 जागा प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक I च्या पदासाठी आहेत.

प्रोजेक्‍ट सायंटिस्ट III, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट II, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट I या पदांसाठी उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. तर उमेदवारांची लेखी परीक्षेद्वारे प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक II आणि प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक I या पदांसाठी निवड केली जाईल.

प्रोजेक्‍ट सायंटिस्ट III, प्रोजेक्‍ट सायंटिस्ट II आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी INCOIS च्या अधिकृत वेबसाइट incois.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर मेन पेजवरील “व्हॅकेन्सी’ टॅबवर क्‍लिक करा. त्यानंतर जाहिरात क्र. INCOIS/RMT/03/2021 वर क्‍लिक करा. आता आपली नोंदणी करा. त्यानंतर अर्ज भरा. त्यानंतर सर्व आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करा. नंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रत आपल्याकडे ठेवा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड