IIT, NIT त इंजिनीअरिंगचे धडे आता मातृभाषेतून

IIT NIT to Offer Engineering Study in Mother Tongue

IIT NIT to Offer Engineering Study in Mother Tongue : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंगचे धडे मातृभाषेतून देणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘तांत्रिक शिक्षण, विशेषत: अभियांत्रिकीचं शिक्षण मातृभाषेत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि पुढील शैक्षणिक सत्रापासून हा निर्णय लागू होईल. यासाठी काही आयआयटी आणि एनआयटीची निवड केली जात आहे.’

बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) शालेय शिक्षण मंडळाशी संबंधित समकालीन परिस्थितीचा आढावा घेत स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यासक्रम आणेल. या अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोगाला निर्देश देण्यात आले आहेत की सर्व शिष्यवृत्ती, फेलोशिप इत्यादी वेळेवर देण्यात याव्यात आणि या संदर्भात हेल्पलाईन सुरू करुन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न त्वरित सोडवावेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एनटीएने गेल्या महिन्यात हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त नऊ प्रादेशिक भाषांमध्ये जेईईची मुख्य परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. मात्र, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देखील प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येईल की नाही, हे आयआयटीने अद्याप निश्चित केलेले नाही.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड