IIM तर्फे CAT परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर

IIM CAT 2021

CAT 2021 Provisional Answer Key

IIM CAT 2021 : Cat’s Provisional Answer Key has been issued. Candidates can register objections till December 11, 2021 on this Provisional Answer-Key (CAT 2021 Answer Key). The CAT is expected to be released by the first week of January 2022. Further details are as follows:-

कॅटची प्रोव्हिजनल आन्सर की जारी झाली आहे. या प्रोव्हिजनल आन्सर- कीवर(CAT 2021 Answer Key) उमेदवार ११ डिसेंबर २०२१ पर्यंत हरकत नोंदवू शकतात. जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कॅटचा निकाल लागणे अपेक्षित आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता आयआयएम अहमदाबादने ही उत्तरतालिका संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. आयआयएम अहमदाबादची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर ही उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. या परीक्षेचे (CAT Exam 2021) आयोजन २८ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या प्रोव्हिजनल आन्सर- कीवर(CAT 2021 Answer Key) उमेदवार ११ डिसेंबर २०२१ पर्यंत हरकत नोंदवू शकतात. या हरकतींची तड लावल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात येईल. त्यानंतर जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कॅटचा निकाल लागणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी ४ ऑगस्ट २०२१ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती. ती २२ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू होती.

How to Download CAT Answer Key 2021 

  • सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जावे.
  • होम पेज वर दिलेल्या Registered Candidate Login च्या लिंक वर क्लिक करा.
  • आता आपला यूजर आयडी आणि पासवर्ड आदी माहिती भरा.
  • आन्सर की आता तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • आन्सर की तपासून घ्या आणि डाऊनलोड करा.

IIM CAT 2021 Entrance Exam

IIM CAT 2021 : IIM Ahmedabad has organized CAT 2021 on 28th November. Admission tickets have already been announced for this and now important instructions have been given for the examination. Candidates are required to follow these instructions at the examination center. Further details are as follows:-

आयआयएम अहमदाबादतर्फे २८ नोव्हेंबर रोजी कॅट २०२१ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेशपत्र आधीच जाहीर करण्यात आले असून आता परीक्षेसाठी महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. उमेदवारांनी परीक्षाकेंद्रावर या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कॅट २०२१ परीक्षा तीन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. उमेदवारांना परीक्षा वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी रिपोर्ट करणे गरजेचे आहे. परीक्षेला येताना उमेदवारांना प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. यासोबतच परीक्षेवेळी उमेदवारांनी पाळण्याचे दिशा निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. सकाळचे सत्र सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत सुरू होईल आणि प्रवेश सकाळी ८.१५ वाजता बंद होईल. दुपारचे सत्र दुपारी १२.३० वाजता सुरू होईल आणि दुपारी २.३० पर्यंत चालेल. या परीक्षेवेळी परीक्षाकेंद्रात दुपारी १२.१५ नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. शेवटचे सत्र दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत असेल. यावेळी दुपारी ४.१५ नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही.

  • A4 आकाराच्या कागदावर प्रवेशपत्र प्रिंट करा. उमेदवाराचा फोटो आणि सही स्पष्टपणे छापलेली असेल तरच प्रवेशपत्र वैध असेल. कॅट परीक्षा केंद्रावर पडताळणीसाठी देण्यापूर्वी प्रवेशपत्रावर दिलेल्या जागेवर फोटो चिकटवा.
  • CAT कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT) मोडवर घेतली जाईल. उमेदवारांना प्रत्येक विभागासाठी ४० मिनिटे आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना ५३ मिनिटे २० सेकंद दिले जातील. वेळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित सेक्शन आपोआप बंद होईल.
  • कॅट २०२१ परीक्षेतील काही प्रश्न बहुपर्यायी प्रश्नांवर (MCQ) आधारित असतील तर काही नॉन एमसीक्यू आधारित प्रश्न असतील.
  • उमेदवारांना एसएमएस आणि ईमेलवर रिपोर्टींगची वेळ मिळेल. त्यानुसार त्यांना परीक्षा केंद्रावर रिपोर्टींग करावे लागेल.
  • परीक्षा केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांना हातात मेटल डिटेक्टर लावले जाईल. उमेदवारांना फक्त कॅट २०२१ प्रवेशपत्र, फोटो ओळखपत्र, मास्क, सॅनिटायझर, आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र (असल्यास) सोबत ठेवण्याची परवानगी असेल.

How to Download CAT 2021 Admit Card

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर जा.
  • वेबसाइटवर दिलेल्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
  • तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • ते आता डाउनलोड करा.
  • परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

After downloading the admission card, the candidates are required to check all the information including their name, date of birth, application number, category, name and address of the examination center, CAT 2021 exam day and shift time. All the guidelines to be followed on the day of examination are given on the admission card.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड