CA इंटरमिजिएट परीक्षेसंदर्भात महत्त्वाची नोटीस!! जाणून घ्या सविस्तर माहिती
ICAI CA Exam Details
CA Intermediate Exam
ICAI CA Exam Details : ICAI (Institute of Chartered Accountants of India) has been declared the important notice for Direct Intermediate Courses (CA Intermediate Exam). The notive is available on official website icai.org. Click on the below link to download the notice. Further detaols are as follows:-
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) डायरेक्ट इंटरमिजिएट कोर्सेससाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची नोटीस बजावली आहे. ही नोटीस आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) म्हणजेच icai.org उपलब्ध आहे. ही नोटीस डाऊनलोड करण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांकडे आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदवीच्या शेवटच्या वर्षाचा निकाल जाहीर न झाल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी मे 2023 मध्ये सीए इंटरमिजिएट परीक्षेसाठी (Intermediate Exam) 31 जुलै 2022 रोजी नोंदणी केली आहे, अशा विद्यार्थ्यांना संस्थेने डायरेक्ट प्रवेशाद्वारे सूट दिली आहे.
- या नोटीसमध्ये तीन गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2022 पर्यंत डायरेक्ट एन्ट्रीवरून तात्पुरती नोंदणी केली आहे.
- मे 2023 मध्ये होणाऱ्या इंटरमिजिएट कोर्ससाठी परीक्षा अर्ज भरण्यापूर्वी पदवी परीक्षा किमान क्रमांकासह उत्तीर्ण झाल्याचा पुरावा त्यांना सादर करावा लागणार आहे.
- हे नियम 28F च्या उप-नियमन (4) मध्ये प्रदान केले आहे.
- दुसरे म्हणजे, विद्यार्थ्यांना ICITSS पूर्ण केल्यानंतर 1 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे व्यावहारिक प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
- यानंतर मे 2023 मध्ये इंटरमिजिएटच्या परीक्षेला बसावं लागेल.
विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी नियमांची काळजी घ्यावी
त्याचबरोबर नोटीसमध्ये सांगितलेल्या तिसऱ्या गोष्टीवर चर्चा झाली, तर ती म्हणजे रेग्युलेशन 28F आणि 28G गरजेमध्ये वरील सूट एकदाच मिळणार आहे. अशा परिस्थितीत मे 2023 मध्ये इंटरमिजिएट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापूर्वी या गोष्टींची खूप काळजी घ्या, असे सांगितले जाते. नोटीसमध्ये नमूद केलेल्या नियमांचे पालन केल्यानंतर भविष्यात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीतून जावे लागणार नाही. परीक्षेपूर्वी तो पूर्णपणे रिलॅक्सही होऊ शकणार आहेत. आयसीएआयने जारी केलेली अधिकृत नोटीस वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
महत्त्वाची नोटीस – https://bit.ly/3cbkrsV
सीए फाउंडेशनच्या निकालात केवळ 25.28 टक्के मुले उत्तीर्ण
- उल्लेखनीय म्हणजे नुकताच सीए फाऊंडेशनचा निकाल आयसीएआयने जाहीर केला.
- सीए फाउंडेशनच्या निकालात केवळ 25.28 टक्के मुले उत्तीर्ण झाली.
- यंदा मुलांनं मुलींपेक्षा सरस कामगिरी केली.
- सीए फाऊंडेशनचा निकाल लागलेल्या मुलांची संख्या 25.52 टक्के, तर मुलींची संख्या 24.99 टक्के होती.
- यंदा सीए फाऊंडेशनच्या परीक्षेसाठी 1 लाख 4 हजार 427 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी केवळ 93 हजार 729 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते.
ICAI CA Course
ICAI CA Exam Details : ICAI Proposal To Reduce Ca Course By Eight Months Other Changes Too. Further details are as follows:-
देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून, स्थानिक परिसरात यशस्वी सीए होता यावे, या दृष्टीने आयसीएआय कार्यरत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- सनदी लेखापाल (CA) अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आले असून, त्यानुसार सीए अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी आठ महिन्यांनी कमी होणार आहे.
- त्याचप्रमाणे आर्टिकलशिपचा कालावधीही दोन वर्षाचा करण्याबाबत आणि स्टायपेंडची रक्कम दुप्पट करण्याचेही प्रस्तावित केले आहे.
- या बदलांचा मसुदा गुरुवारी रात्री प्रकाशित करण्यात आला असून, त्यावर ३० दिवसांत सूचना करण्याचे आवाहन इंडियन चार्टर्ड अकाउंटन्टस ऑफ इंडियाकडून (ICAI) करण्यात आले आहे.
- आयसीएआयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलतर्फे (WIRC) आयोजित दोन दिवसीय ३६व्या विभागीय परिषदेच्या निमित्ताने आयसीएआयचे उपाध्यक्ष सीए अनिकेत तलाठी पुण्यात आले होते.
- त्यांनी या प्रस्तावित बदलांबाबत ‘मटा’ला माहिती दिली.
- यावेळी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे उपस्थित होते. देशातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही सीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून, स्थानिक परिसरात यशस्वी सीए होता यावे, या दृष्टीने आयसीएआय कार्यरत आहे.
- नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- त्या अनुषंगाने सीएची परीक्षा विद्यार्थ्यांना आर्टिकलशिप झाल्यानंतर सहा महिन्यांनी देता येणार आहे.
- या सहा महिन्यांत विद्यार्थ्याला तयारी करावी लागणार आहे.
- एखाद्याला स्वतःची प्रॅक्टीस करायची झाल्यास, त्याला तीन वर्षे आर्टिकलशिप करावी लागणार आहे. त्यानंतर एका वर्षाने परीक्षा देता येईल.
- मात्र, एखाद्या कंपनीत सीए म्हणून नोकरी करायची झाल्यास, दोन वर्षे आर्टिकलशिप ग्राह्य धरली जाईल.
- इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षेत विषयांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यातील काही विषय हे ई-लर्निंग पद्धतीने शिकविले जातील.
- त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने, त्याची परीक्षा होईल.
- या बदलामुंळे अंतिम परीक्षेत दोन ग्रुपमध्ये प्रत्येकी चारऐवजी तीन विषय राहतील आहे.
- त्यामुळे एकूण सहा विषय असतील, असे तलाठी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय मानकांचा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समावेश
नव्या बदलांनुसार सीए अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय मानकांचा, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समावेश करण्यात आला आहे. याला अनुसरून ऑप्शनल विषय म्हणून संविधान विषयाचा समावेश केला आहे. नव्या अभ्यासक्रमात प्रात्याक्षिकांवर आधारित बदलांवर अधिक भर दिला आहे. देशात सीए अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सध्या जागतिक बदलांमुळे सीएंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्या प्रमाणात सीए उपलब्ध होत नसल्याचेही तलाठी यांनी सांगितले.
आर्टिकलशिपमध्ये दरमहा स्टायपेंड
शहरांचे गट – प्रथम वर्ष – द्वितीय वर्ष – तृतीय वर्ष
- २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले शहर – ४००० – ५००० – ६०००
- पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आणि २० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणारे शहर – ३०००- ४००० -५०००
- पाच लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणारे शहर – २००० – ३००० – ४०००
CA Final Admit Card 2022
ICAI CA Exam Details : The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has issued CA Final Admission Card 2022 for the May session. Admission to CA Final May Session Exam 2022 has been published online on ICAI’s official website icai.org/ icaiexam.icai.org. Further details are as follows:-
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) मे सत्रासाठी CA अंतिम प्रवेशपत्र 2022 (CA Final Admit Card 2022) जारी केले आहे . CA Final May Session Exam 2022 चे प्रवेशपत्र ICAI च्या अधिकृत वेबसाइट icai.org/ icaiexam.icai.org वर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- सीए फायनल / इंटरमीडिएट प्रवेशपत्र मे २०२२ डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक खाली दिली आहे.
- या परीक्षेला बसलेले उमेदवार प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
- उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड यांसारखी त्यांची लॉगिन क्रिडेन्शियल्स वापरावी लागतील.
- सीए फायनल मे २०२२ च्या परीक्षेत बसण्यासाठी प्रवेशपत्र हे अनिवार्य कागदपत्र आहे.
- त्यात रोल नंबर, परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, वेळ आणि सूचना यासारखी माहिती असते.
- सीए अंतिम मे सत्र परीक्षेच्या तारखा ग्रुप १ साठी १४,१७, १९ आणि २१ मे आहेत. ग्रुप २ साठी २३, २५, २७ आणि २९ मे या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
- (CA Final 2022 Exam Date) परीक्षेला बसलेले उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सची मदत घेऊ शकतात.
How To Download CA Final Admit Card 2022
- १. अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org ला भेट द्या .
- २. नोंदणी क्रमांक / लॉगिन आयडी आणि पासवर्ड सारख्या क्रिडेन्शियल्सचा वापर करून मुख्यपृष्ठावर लॉग इन करा.
- ३. अॅडमिट कार्ड टॅब/लिंक समोरील व्ह्यू बटणावर क्लिक करा.
- ४. सीए फायनल २०२२ चे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- ५. सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा.
- ६. आता अॅडमिट कार्ड म्हणेजच प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
Important
उमेदवारांना अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला आहे, आणि त्यात काही चूक असल्यास, त्यांनी ती सुधारण्यासाठी परीक्षा आयोजित करणार्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. हेल्पलाइन क्रमांक ०१२० ३०५४८०६ ८१९ किंवा [email protected] वर मेल करता येईल. प्रवेशपत्रासह आयडी पुरावा परीक्षा हॉलमध्ये घेऊन जा. ICAI CA अंतिम परीक्षेच्या तारखेसह CA अंतिम परीक्षा केंद्राची यादी प्रसिद्ध करते. ICAI CA 2022 चा अर्ज भरताना, उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र भरण्याचा पर्याय दिला जातो. अंतिम परीक्षा केंद्र प्रवेशपत्रावर दिलेले असते.
ICAI CA May June Exams 2022
ICAI CA Exam Details : The Institute of Chartered Accountants of India has re-opened the registration window for the May-June examinations. Candidates who have not yet applied for this exam will be able to apply for this exam. The deadline is March 30, 2022. Candidates should note that this will be the last chance to apply for the May / June 2022 exam. Further details are as follows:-
इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियातर्फे मे-जून परीक्षांसाठी नोंदणी विंडो पुन्हा खुली करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांना या परीक्षांसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी ३० मार्च २०२२ पर्यंत अवधी देण्यात आला आहे. मे/जून २०२२ च्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी असेल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
ICAI ने या संदर्भात अधिकृत नोटीसमध्ये दिलेल्या माहितनीनुसार, ‘चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन, फायनल, इंटरमीडिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट( International Taxation Assessment Test, INTT AT) साठी अर्ज भरण्यासाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. चार्टड अकाऊंट परीक्षांसाठी मे/जून २०२२ साठी शहर/ग्रुप/मीडियम बदलू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर हे बदल करता येणार आहेत. यासाठी ३० मार्च २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांसाठी मे/जून २०२२ च्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. त्याचबरोबर या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सीए फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल
इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) मे सीए फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आयसीएआयकडून अधिकृत वेबसाइटवर नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मे सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये (CA Foundation exam 2022) बसलेल्या सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icai.org वर वेळापत्रक तपासता येणार आहे. परीक्षेच्या तारखा बदलल्याचे कारणही संस्थेने नोटीसमध्ये दिले आहे.
Due to the release of CBSE Term 2 Exam 2022 Schedule and ICSE Term 2 Exam 2022 Schedule, the examination dates have been changed, ICAI said. The CA Foundation exams were to be held on 25th, 27th and 29th of May, 2022. However, it has been decided to change the schedule so that students appearing for CBSE Term 2 (2021-22) and ICSE Term 2 examinations do not face any difficulty.
Table of Contents