आयसीएआय बोर्डाच्या परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला, चेक करा..- ICAI 10th, 12th Results 2024
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डातर्फे (आयसीएआय) इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, ६ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आयसीएआय बोर्डातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षा १२ मार्चपर्यंत, तर बारावीच्या परीक्षा ३ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आली. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे अडीच लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मागील वर्षी १४ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. मागील वर्षी मुलांपेक्षा मुलींची निकालाची टक्केवारी अधिक होती.
आयसीएआय बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर होणार, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम होता. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या खोट्या तारखा व नोटिसा सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे विद्यार्थी व पालक गोंधळून गेले होते. बोर्डाने संकेतस्थळावर सोमवार (दि.६) रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना cisce. result.org या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
Comments are closed.