HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर- चेक करा! राज्याचा निकाल 91.25 टक्के, मुली अग्रेसर, कसा आणि कुठे चेक कराल !
HSC Result 2023
Maharashtra HSC 12th Exam Result 2023
HSC Result 2023 : Maharashtra Board HSC Board Exam Result 2023 Updates- The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will declare the result of Class 12th tomorrow. Students will be able to check their 12th result online at 2 pm. The 10th-12th examination was conducted in the month of February-March through the Pune Board. Maharashtra board result 2023 class 12 direct links will be available soon. :-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या सेक्शन किंवा लिंक्स वरून आपल्याला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी महाराष्ट्र एचएससी बोर्डाची परीक्षा दिली. उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 91.25 टक्के आहे. इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेत ९३.७३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८९.१४ टक्के मुलांच्या तुलनेत. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे आज म्हणजे (२५ मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.
खालील सेक्शन मध्ये आपण रोल नंबर / नाव वरून २.०० पासून निकाल बघू शकता. तरी निकाल संदर्भातील सर्व अपडेट्स साठी महाभरतील भेट देत रहा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
निकालानंतर प्रवेश प्रक्रिया
यंदापासून नवीन राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी राज्यातील सर्वच अकृषिक विद्यापीठांमध्ये होणार आहे. त्यामुळे बारावीनंतरचे शिक्षण आता त्या धोरणानुसारच घ्यावे लागणार आहे. त्याचीही तयारी युद्धपातळीवर सुरु झाली आहे.
बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला काही दिवसांचा अवधी मिळणार आहे. साधारणत: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल.
मित्रांनो, खालील अधिकृत लिंक वरून आपण उद्या दुपारी 2 पासून सरळ निकाल बघू शकता, तसेच साईट स्लो झाल्यास आम्ही नवीन लिंक्स वेळेवर अपडेट करूच, तेव्हा महाभरतीवरून निश्चित निकाल बघा !
- आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल.
निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.
12th result 2023 Maharashtra board by name
12th result 2023 Maharashtra board by School
12th result 2023 Maharashtra board by Roll Number
[…] Source link […]
Sunil pawarav sbl