डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे अर्ज भरण्यास सुरुवात

Homi Bhabha Balvaidnyanik Spardha 2021

Homi Bhabha Balvaidnyanik Spardha 2021 : शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.

ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, कृतीसंशोधन प्रकल्प व विज्ञान विषयक सामान्य ज्ञानावर मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा ऑफलाइन होते. मात्र यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी शाळेमार्फत अर्ज भरले जात होते. यंदा प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे थेट नावनोंदणीचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनाही नावनोंदणी २८ डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. सहावीची परीक्षा १७ जानेवारी रोजी तर नववीची परीक्षा २४ जानेवारी रोजी होणार आहे. तर निकाल ३ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. नावनोंदणी आणि सविस्तर माहिती पालकांनी www.msta.in या वेबसाइटवर भेट द्यावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड